गुवाहाटी : भारतात सर्वत्र रेल्वेचे जाळे पसरले आहे. आतापर्यंत तुम्ही देशभरातील रेल्वे स्थानकांवर अनेक चहाच्या स्टॉलवर चहा विकताना पुरुषांना पाहिले असेल. पण आता गुवाहाटी रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच काहीतरी नवीन पाहायला मिळाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे इथे देशातील पहिला ट्रान्स टी स्टॉल उभारण्यात आला असून आता इथे ट्रान्सजेंडर चहा विकताना दिसणार आहेत.
दरम्यान, तृतीयपंथी समुदायाच्या विकासासाठी अनेक पावले सातत्याने उचलली जात आहेत. भारतीय रेल्वेनेही याबाबत मोठा पुढाकार घेतला असून ट्रान्सजेंडर समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर पहिला ट्रान्स टी स्टॉल सुरू करण्यात आला आहे. गुवाहाटी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर हा चहाचा स्टॉल बांधण्यात आला आहे, जिथे आता ट्रान्सजेंडर चहा विकतील.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या चहाचे स्टॉलचे फोटो शेअर केले आहेत आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरील भारतातील पहिला ट्रान्स टी स्टॉल असल्याचे सांगितले आहे. माहितीनुसार, हा चहाचा स्टॉल 10 मार्च रोजी उघडण्यात आला होता, जो पूर्णपणे ट्रान्सजेंडर चालवणार आहेत. ट्रान्सजेंडर्सच्या आर्थिक विकासासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. तसेच इतर रेल्वे स्थानकांवरही असे आणखी स्टॉल उघडले जाणार असल्याचे समजते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"