West Bengal Metro:पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये आता पाण्याखालून मेट्रो ट्रेन जाणार आहे. कोलकातामध्ये मेट्रोच्या इस्ट-वेस्ट कोरिडोअरअंतर्गत हुगली नदीखली भूयाराचे काम पूर्ण झाले आहे. हे भूयार तयार करण्यासाठी 120 कोटी रुपयांचा खर्च आला. नदीमधून जाणारे हे भारतातील पहिलेच भूयार आहे.
33 मीटर खोल भूयार‘यूरोस्टार’च्या लंडन-पॅरिस कोरिडोअरच्या धर्तीवर हे भूयार तयार करण्यात आले आहे. 520 मीटर लांबीचे हे भूयार पार करण्यासाठी ट्रेनला 45 सेकंदाचा वेळ लागेल. विशेष म्हणजे, हे भूयार जमिनीपासून 33 मीटर आणि नदीच्या तळापासून 13 मीटर खोल तयार करण्यात आले आहे. हे भूयार पूर्व हावडा मैदानला आयटी केंद्र सॉल्ट लेक सेक्टर पाचशी जोडेल.
काय फायदा होणार?न्यूज एजेंसी पीटीआईने सांगितल्यानुसार, कोलकाता मेट्रो रेल कॉरपोरेशनचे महासंचालक (सिव्हिल) शैलेश कुमार यांनी सांगितले की, कोलकाता मेट्रोच्या इस्ट-वेस्ट कोरिडोअरसाठी हे भूयार बनवणे गरजेचे होते. गचबचलेला आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या परिसरामुळे मेट्रोचे काम अवघड झाले होते. यामुळेच नदीतून भूयार करण्याची योजना आखली गेली.