शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

भारताचे जी-२०चे अध्यक्षपद दुफळी दूर करण्याचा प्रयत्न, अडथळे संपविणार- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 12:03 PM

पंतप्रधान मोदी : परिषद ‘लोक चळवळ’; अडथळे संपविणार

नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेला ‘लोक चळवळ’ असे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, या माध्यमातून दुफळी दूर करणे, अडथळे दूर करणे आणि सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामागील कल्पना अशी आहे की, एक असे जग निर्माण करणे जिथे एकता सर्व मतभेदांपेक्षा श्रेष्ठ असेल. 

मोदी यांनी म्हटले आहे की, याच विचारातून भारताने ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिट’चेही आयोजन केले होते, ज्यामध्ये १२५ देश सहभागी झाले होते. भारताच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या सर्वात महत्त्वाच्या उपक्रमांपैकी हा एक आहे. . 

आफ्रिकन युनियनला सहभागी करण्यास समर्थन : चीनचीनने जी-२०मध्ये आफ्रिकन युनियन (एयू) चा समावेश करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले. हा पहिलाच देश आहे ज्यांनी संघटनेत आफ्रिकन गटाच्या समावेशाचे जोरदार समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आफ्रिकन युनियनला जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या जी-२०मध्ये पूर्ण सदस्य म्हणून समाविष्ट करण्यास समर्थन दिले आहे. आफ्रिकन युनियनमध्ये आफ्रिका खंडातील ५५ देश सहभागी आहेत.

डिनरला अंबानी आणि अदानी यांच्यासह ५०० उद्योजक   उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह ५०० उद्योजक ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेनंतर डिनरला उपस्थित राहतील. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल, आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आदी प्रमुख उद्योजक उपस्थित राहणार आहेत. 

व्ही. के. सिंह करणार बायडेन यांचे आज स्वागतकेंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज स्वागत करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन शुक्रवारी संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल होणार आहेत. ते रात्री पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या ताफ्यात ६० वाहने असणार आहेत. दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बायडेन हे सीक्रेट सर्व्हिसच्या ३०० कमांडोंच्या सुरक्षेत असतील.

रशिया, चीनचे राष्ट्राध्यक्ष अनुपस्थित या शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे उपस्थित राहणार नाहीत.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी