नवी दिल्ली : ऑक्टोबरच्या प्रारंभी मानवी हक्क वकील शालिनी गेरा यांच्याशी टोरोंटो युनिव्हर्सिटीतील सिटीझन लॅबमधून जॉन स्कॉट रैलटन यांनी संपर्क साधून ‘तुम्ही डिजिटल रिस्कमध्ये आहात’, असे सांगितले होते. शालिनी गेरा या एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज या कार्यकर्तीचा बचाव करणाºया कायदा तुकडीत आहेत. एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. सिटीझन लॅबकडे फोन नंबर्सची यादी असून, या नंबर्सवर हेरगिरी करणारी पेगॅसस यावर्षी फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत लक्ष ठेवून होती. या यादीत माझा नंबर दिसला, असे गेरा म्हणाल्या. इस्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपने पेगॅसस विकसित केली आहे. इस्रायलच्या स्पायवेअरच्या हिट लिस्टमध्ये असलेल्या व्यक्ती- चंदीगडस्थित अंकित ग्रेवाल यांनी सुधा भारद्वाज यांची एल्गार परिषदप्रकरणी बाजू मांडली.सरकारी, लष्करी अधिकारीही लक्ष्यवॉशिंग्टन : अमेरिकेसोबत असलेल्या त्याच्या मित्र देशांच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना यावर्षी हॅकिंगच्या सॉफ्टवेअरने लक्ष्य बनवण्यात आले होते. या अधिकाºयांचे फोन नंबर्स मिळवण्यासाठी फेसबुकच्या व्हॉटस्अॅपचा वापर केला गेला होता, असे व्हॉटस्अॅपच्या चौकशीशी संबंधित लोकांनी सांगितले. ज्या लोकांच्या नीजतेचे उल्लंघन झाले आहे त्यात पाच खंडांतील किमान २० देशांतील लोक हे अतिशय मोठ्या पदांवरील सरकारी आणि लष्करी अधिकारी आहेत. त्यात अनेक देश हे अमेरिकेचे मित्र आहेत, असे सूत्रांनी सांगितले.हे आहेत सामाजिक कार्यकर्तेविवेक सुंदरा हे मुंबईस्थित सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते असून, ते कबीर कला मंच संरक्षण समितीचे सदस्य आहेत.आनंद तेलतुंबडे हे शिक्षणतज्ज्ञ असून एल्गार परिषदप्रकरणी आरोपी आहेत. बेला भाटिया या चंदीगडस्थित मानवी हक्क कार्यकर्त्या.रूपाली जाधव या कबीर कला मंचच्या सदस्य. शुभ्रांशू चौधरी हे चंदीगडमध्ये सक्रिय कार्यकर्ते असून ते बीबीसीचे माजी पत्रकार आहेत.सीमा आझाद या पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजच्या कार्यकर्त्या. संतोष भारतीया हे ‘चौथी दुनिया’चे एडिटर इन चीफ असून, फारुकाबाद (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. अजमल खान हे दिल्लीत संशोधक असून, २०१६ मध्ये रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनात ते सहभागी होते.
भारतातील पत्रकार, कार्यकर्ते बनवले गेले हेरगिरीचे लक्ष्य; २० देशांत पसरले जाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 6:31 AM