शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

भारताची 'मंगळ'झेप

By admin | Published: September 24, 2014 8:21 AM

अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बुधवारी सुवर्ण अध्यायाची नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करण्याची किमया साधली आहे.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरु, दि. २४ - अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बुधवारी सुवर्ण अध्यायाची नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करण्याची किमया साधली आहे. सकाळी आठच्या सुमारास मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला असून पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी झाल्याने इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 
मंगळावर संशोधन करण्यासाठी इस्त्रोने मार्स ऑर्बिटर मिशन ही महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेअंतर्गत ५ नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील पीएसएलव्ही सी -२५ च्या मदतीने मंगळयान प्रक्षेपित करण्यात आले होते. ३०० दिवसांमध्ये सुमारे ६६६ दशलक्ष किलोमीटरचे अंतर कापून मंगळयानाने बुधवारी यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. बुधवारी सकाळी पावणे सातपासून मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मंगळयानाला रेटा देण्यासाठी  ‘लिक्विड अ‍ॅपोजी मोटार इंजिन सुरु करण्यात आले. सुमारे २४ मिनीटे हे इंजिन सुरु होते. सर्व टप्पे सुरळीत पार केल्यानंतर ८ वाजण्याच्या सुमारास मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला व भारताची महत्त्वाकांक्षी मंगळ मोहीम निर्विघ्न पार पडल्याचे इस्त्रोतर्फे जाहीर करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही इस्त्रोच्या कंट्रोल रुममध्ये उपस्थित होते.मोहीम फत्ते झाल्याचे स्पष्ट होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. आजचा क्षण ऐतिहासिक असून इस्त्रोतील शास्त्रज्ञांच्या अथक मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. इस्त्रोतील शास्त्रज्ञांना अशक्य ते शक्य करुन दाखवण्याची सवय लागली असून या शास्त्रज्ञांनी प्रगत देशांनाही मागे टाकून मंगळावर झेप घेतल्याचा अभिमान वाटतो अशा शब्दात मोदींनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले. क्रिकेट सामना जिंकल्यावर जसा देशभरात आनंदोत्सव साजरा केला जातो तसाच आनंदोत्सव आज देशभरातील शाळा - महाविद्यालयांमध्ये साजरा करायला पाहिजे असेही मोदींनी सांगितले.  
पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिलाच देश बनला आहे. तसेच मंगळ मोहीम पूर्ण करणा-या अमेरिका, रशिया, युरोपीय महासंघ या देशांच्या रांगेत आता भारताचाही नंबर लागला आहे. १९९९ व २००१ मध्ये जपान व चीननेही मंगळ मोहीमेसाठी प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना अपयश आले होते. मंगळाच्या कक्षेत स्थिरावल्यावर मंगळयानाकडून बुधवारी दुपारनंतर इस्त्रोला मंगळाचे पहिले छायाचित्र उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. 
 
मंगळयानाचे वैशिष्ट्ये
> मंगळयानाचे वजन १३५० किलोग्रॅम ऐवढे आहे. 
> मंगळ मोहीमेसाठी ४५० कोटी रुपये खर्च झाला असून अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. अंतराचा विचार केल्यास भारताला प्रति किलोमीटर ११ रुपये ऐवढाच खर्च झाला आहे. 
> इस्त्रोच्या दीड हजार अधिकारी व कर्मचा-यांनी या मोहीमेसाठी दिवसरात्र अथक मेहनत घेतली. 
> या मोहीमेद्वारे भारताला मंगळव ग्रहाविषयी संशोधन करता येणार आहे. तसेच मंगळ ग्रहाची छायाचित्रेही भारताला मिळणार आहेत.