शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

देशातले 50 टक्के श्रीमंत आहेत 'या' 5 राशींचे; बघा तुम्हाला धनलाभाचा योग आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 2:09 PM

जगभरात अनेक कोट्यधीश आहेत. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. बार्कलेज हुरुन इंडियानंही अशा श्रीमंतांची एक यादी प्रसिद्ध केली होती.

नवी दिल्ली- जगभरात अनेक कोट्यधीश आहेत. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. बार्कलेज हुरुन इंडियानंही अशा श्रीमंतांची एक यादी प्रसिद्ध केली होती. परंतु तुम्हाला माहीत आहे का, बार्कलेज हुरुन इंडियानं प्रसिद्ध केलेल्या यादीतील श्रीमंत व्यक्तींपैकी जवळपास 50 टक्के लोक विशेष पाच राशींमधून येतात.बार्कलेज हुरून इंडियानं जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीतील 50 टक्के श्रीमंत माणसे ही कर्क, कन्या, मेष, वृश्चिक आणि मकर राशीतून येतात. यातील 10.50 टक्के संपत्तीसह कर्क राशीतील लोक सर्वात वरच्या स्थानी आहेत. कर्क राशीच्या श्रीमंतांमध्ये 71,200 कोटींच्या संपत्तीसह गौतम अडानी सर्वात श्रीमंत आहेत. देशात श्रीमंतांच्या यादीत दुस-या स्थानी कन्या राशीचे लोक आहेत. कन्या राशीच्या लोकांकडे 9.70 टक्के संपत्ती आहे. त्यानंतर तिस-या स्थानी मेष राशीच्या व्यक्तींचा समावेश आहे.  त्यांच्याजवळ 9.3 टक्के संपत्ती आहे. चौथ्या क्रमांकावर वृश्चिक राशीचे लोक असून, ते 9.2 टक्के संपत्तीचे मालक आहेत.तर मकर राशीतले व्यक्ती 9 टक्क्यांच्या संपत्तीसह 5 स्थानी आहेत. शापूरजी पालोनजी मिस्त्री कन्या राशीतील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. तर रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी, लुलू ग्रुपचे युसुफ अली आणि गोदरेजची स्मिता वी. कृष्णा या श्रीमंत व्यक्ती मेष राशीतील आहेत. मेषनंतर वृश्चिक आणि मकर राशींचा नंबर लागतो. कर्क, कन्या, मेष, वृश्चिक आणि मकरनंतर इतर राशींना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. यात अनुक्रमे सिंह, मीन, मिथुन, वृषभ, कुंभ आणि धनू या राशींचा नंबर लागतो. या राशीच्या लोकांकडे क्रमशः 8.5 टक्के, 8.4 टक्के, 8.1 टक्के, 7.3 टक्के, 6.9 टक्के, 6.6 टक्के आणि 6.4 टक्के संपत्ती आहे.बार्कलेज हुरुन इंडियाच्या यादीनुसार सिंह राशीचे असलेले विप्रोचे अजिम प्रेमजी हे श्रीमंत आहेत. तर सिंहनंतर तूळ राशीच्या सन फार्माच्या दिलीप सांघवी, कोटक बँकेचे उदय कोटक आणि मित्तल ग्रुपचे सीईओ एल. एन. मित्तल यांचा नंबर लागतो. तूळनंतर मीन आणि मिथुन राशींच्या लोकांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. सायरस पुनावाला, ब्रिटानियाचे नस्ली वाडिया आणि हिंदुजा ग्रुपचे एसपी हिंदुजा वृषभ, कुंभ आणि धनू राशीतून येतात. परंतु देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानीच आहेत.