शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

ओबामांनी अनुभवली भारताची सैन्यशक्ती

By admin | Published: January 27, 2015 11:42 PM

राजधानीतील राजपथावर रिमझिम पावसाच्या साक्षीने आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत भारतीयांचा गौरव वाढविणारा

नवी दिल्ली : राजधानीतील राजपथावर रिमझिम पावसाच्या साक्षीने आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत भारतीयांचा गौरव वाढविणारा प्रजासत्ताक दिनाचा देखणा सोहळा सोमवारी अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी देशाने आपल्या सैन्यशक्तीसोबतच भारताच्या विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक वैभवाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या कार्यक्रमानिमित्त दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता.देशाच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यास उपस्थित राहणारे ओबामा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. विशेष म्हणजे सकाळपासूनच सुरू असलेला पाऊस आणि बंदोबस्तानंतरही लोक मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले. व्यासपीठावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उजवीकडे काळा सूट परिधान करून ओबामा विराजमान होते. तर डावीकडे मिशेल ओबामा बसल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा कोट आणि शिरावर तुर्रेदार राजस्थानी फेटा बांधला होता. सुमारे दोन तास चाललेल्या या पथ संचलनादरम्यान उभय नेत्यांमध्ये चित्ररथांबाबत माहितीची देवाणघेवाण सुरू होती.