शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अवकाशानंतर समुद्राच्या खोलाशी जाण्याची भारताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2017 5:12 PM

अंतराळ क्षेत्रातील यशस्वी कामगिरीनंतर भारत आता आणखी एका क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायला सज्ज होतो आहे. समुद्राची खोली मोजण्याची तयारी  सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत.

ठळक मुद्दे  अंतराळ क्षेत्रातील यशस्वी कामगिरीनंतर भारत आता आणखी एका क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायला सज्ज होतो आहे. समुद्राची खोली मोजण्याची तयारी  सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत. . माणसांना अवकाशात घेऊन जाणार GSLV-Mk3 हे यान लॉन्च केल्यानंतर भारत आता माणसांना खोल समुद्रात घेऊन जाण्यास सज्ज होतो आहे. ईएसएसओ-नॅशनल इस्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीशी जोडलेल्या शास्त्रज्ञांची एक टीम समुद्रातील खोल पाण्यात जाण्याचं एक वाहन तयार करते आहे

चेन्नई, दि.5-  अंतराळ क्षेत्रातील यशस्वी कामगिरीनंतर भारत आता आणखी एका क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायला सज्ज होतो आहे. समुद्राची खोली मोजण्याची तयारी  सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत. माणसांना अवकाशात घेऊन जाणार GSLV-Mk3 हे यान लॉन्च करण्याची तयारी सुरू असताना भारत आता माणसांना खोल समुद्रात घेऊन जाण्यास सज्ज होतो आहे.  द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

ईएसएसओ-नॅशनल इस्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीशी जोडलेल्या शास्त्रज्ञांची एक टीम समुद्रातील खोल पाण्यात जाण्याचं एक वाहन तयार करते आहे. या वाहनाचं प्राथमिक डिझाइन तयार असून या वाहनामधून तीन जण समुद्रात खोलपर्यंत जाऊ शकतात. हे वाहन पुढील पाच वर्षात तयार होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. समुद्राच्या खोल पाण्यात जाणार हे वाहन बनवायला जवळपास 500 करोडचा खर्च अपेक्षित आहे. या गाडीच्या मदतीने शास्त्रज्ञ समुद्रात सहा किलोमीटरपेक्षा जास्त खोल जाऊ शकणार आहेत. यातून खोल समुद्रात असणाऱ्या दुर्मिळ धातू आणि जीव-जंतूंबद्दल माहिती मिळविली जाणार आहे. 

समुद्रात खोलवर जाणारं हे वाहन तयार झाल्यानंतर भारताची गणना अशा ठराविक देशांमध्ये केली जाइल, ज्या देशांनी समुद्रातील खोल पाण्यात माणसांना पाठविण्याची प्रणाली विकसीत केली आहे. सध्या चीन, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जापान या देशांनी खोल समुद्रात लोकांना पाठविण्याची किमया साधली आहे. या वाहनासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून, केंद्राकडून तो मंजूर होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. केंद्राकडून मंजूरी मिळतात शास्त्रज्ञांची एक टीम या डिझाइनचं मुल्यांकन करून त्यांला अजून चांगलं बनवेल, असं एनआयओटीचे डायरेक्टर सतीश शेनोई यांनी सांगितलं आहे. या टीममध्ये इस्त्रो, डीआरडीओ आणि आयआयटीच्या तज्ज्ञांचा समावेश असेल. सध्या जे डिझाइन तयार आहे त्यानुसार,या वाहनला एका जहाजातून समुद्राच्या आता नेऊन उतरवलं जाइल. या वाहनातून आत गेलेल्या व्यक्ती पाण्याच्या आतमध्ये आठ ते दहा तास काम करू शकतील. तसंच समुद्राच्या तळासी असलेली सामुग्री गोळा करू शकणार आहेत. तसंच वाहनाला असलेल्या काचेच्या खिडकीमुळे शास्त्रज्ञांना समुद्रातील आतल्या बाजूंची योग्य माहिती मिळविणं शक्य होणार आहे. दरम्यान, हे मोठं ध्येय गाठण्याच्या आधी शास्त्रज्ञ या वाहनाशी मिळताजुळतं एक समुद्री यान पुढील तीन वर्षात बनविण्याची योजना आखत आहेत. जे वाहन लोकांना हिंद महासागरात 500 मीटरपर्यंत आत घेऊन जाऊ शकेल. शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसंच मोठ्या मोहीमेसाठी काही प्रमाणात अनुभव मिळावा, यासाठी हा छोटा प्रकल्प राबविला जाणार आहे.