शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

युक्रेन-रशिया युद्धात भारताची  मध्यस्थी करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 5:40 AM

पंतप्रधान मोदींनी जाहीर केली भूमिका, जर्मनीचे चान्सलर शोल्ज यांच्याशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धावर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज आहे. युद्ध थांबविण्यासाठी कोणत्याही शांतिप्रक्रियेत सहभागी होण्यास भारत तयार आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज यांनी शनिवारी स्वच्छ ऊर्जा, व्यवसाय, संरक्षण आणि नवीन तंत्रज्ञान यासह अनेक मुद्यांवर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा केली. त्यावेळी ही भूमिका त्यांनी जाहीर केली.दोन्ही नेत्यांच्या बैठकीत रशिया-युक्रेन संघर्ष, डिजिटल परिवर्तन, फिनटेक, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, पुरवठा साखळी आणि स्वच्छ ऊर्जा आदी विषयांवर विचारांचे आदान-प्रदान झाले. नंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

युक्रेन युद्धाचा जगावर परिणाम : माेदीnमोदी यांनी सांगितले की, कोविड साथ आणि युक्रेन युद्ध याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. विशेषत: विकसनशील देशांवर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. nयाबाबत आम्ही एकमेकांची चिंता जाणून घेतली. यावर एकत्रित प्रयत्न करूनच तोडगा काढला जाऊ शकतो, याबाबत आमची सहमती झाली आहे. जी-२० च्या अध्यक्षपदाची जबाबदारी निभावताना भारत या दिशेने प्रयत्न करीत आहे.

शोल्ज यांचा पहिलाच भारत दौराजर्मनीचे चान्सलर शोल्ज हे शनिवारी भारताच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आले. अंजेला मर्केल यांच्या १६ वर्षांच्या ऐतिहासिक कार्यकाळानंतर शोल्ज हे डिसेंबर २०२१ मध्ये जर्मनीचे चान्सलर बनले. त्यानंतर ते पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत.

हिंसेद्वारे देशाच्या सीमा बदलू शकत नाही : चान्सलर शोल्ज जर्मन चान्सलर शोल्ज यांनी सांगितले की, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील देशांवर आक्रमक युद्धाचा परिणाम होऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. युक्रेनमध्ये युद्धामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 

पायाभूत सुविधा आणि वीज वितरण व्यवस्था नष्ट झाली आहे. हे एक संकट आहे. रशियाच्या आक्रमणामुळे संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. युद्ध हे मूलभूत सिद्धांतांचे उल्लंघन करते, यावर आम्ही सर्वजण सहमत आहोत. हिंसेच्या माध्यमातून तुम्ही देशांच्या सीमा बदलू शकत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया