नवी दिल्ली - भारताने पाकच्या दाव्यावर प्रत्युत्तर देत कुलभूषण यांना भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे म्हटले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कोर्टाने याआधीच असे म्हटले आहे की, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करीत आहे. कुलभूषण जाधव यांचे संरक्षण करणं आणि त्यांचे भारतात परत येणं सुनिश्चित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्या दृष्टीने भारत सरकार सर्व योग्य पर्यायांचा विचार करेल असे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने आता असा अजब दावा केला आहे. तसेच कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाक सरकारने केला आहे. तसेच जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस देण्याची ऑफर देण्यात आल्याचा देखील पाकिस्तानचा दावा आहे. जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती आहे.पाकिस्तानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जाधव यांना १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, मात्र जाधव यांनी नकार दिला. यासंदर्भात पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना पत्र लिहिले आहे. पाकिस्तानने दुसऱ्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस देण्याची ऑफर दिली आहे. पाकिस्तानमध्ये कुलभूषणबाबत अशा घडामोडी सुरु असताना पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ
राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात