सुरेश भटेवरा, नवी दिल्लीकाश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या तळावर पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर भारत- पाकिस्तान सीमेवरचा तणाव अनेक पटीने वाढला आहे. भारताने आपली संरक्षण सिध्दता मजबूत करण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे. ७७८ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात भारतीय सैन्य तैनात केले जात आहे. शस्त्रास्त्रे, दारूगोळा व इंधन इत्यादीची भरपूर रसदही रवाना करण्यात आली आहे. ही सारी तयारी युध्दसदृश स्थितीचा इशारा देणारी आहे. रविवारी आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधान मोदींनी ‘भारताचे सैन्यदल बोलत नाही, पराक्रम करून दाखवते’ असा सूचक इशाराही दिला आहे.उरी हल्ल्यानंतर उसळलेल्या संतापाच्या लाटेला शांत करण्यासाठी भारत आणि पाक हे दोन्ही देश खरोखर युध्दाला सामोरे जातील काय? याचे उत्तर नकारार्थी असले, तरी संरक्षण सिध्दतेत भारत पाकिस्तानपेक्षा अनेक पटीने पुढे आहे, या वास्तवाची जाणीव संरक्षण मंत्रालयाने करून दिली आहे.पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची जोरदार मागणी देशभर उमटली. कट्टर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या काही व्यक्ती व संघटनांनी तर यावरून युद्धज्वर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी यांनी सरकारमधील आपले सहकारी आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांच्याशी चर्चा करून उतावळी आक्रमकता दाखविण्याऐवजी मुत्सद्दी संयम राखून राजनैतिक मार्ग वापरून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडण्याचा निर्णय घेतला. अनेकांना हे पटलेले नाही व सत्ताधारी रालोआमधील काही मित्रपक्षांनी हा कचखाऊपणा असल्याची टिकाही सुरु केली आहे. पण या प्रक्षोभक क्षणाला भारताने घेतलेला पवित्रा हा दुर्बलाचा पळपुटेपणा नाही तर बलवानाने केवळ बाहुबलाचा विचार न करता शांत डोक्याने राखलेला प्रगल्भ संयम आहे, याची प्रचिती संरक्षण मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीवरून सहजपणे येऊ शकते. युनोच्या आमसभेत आज सुषमा स्वराज देणार पाकला उत्तर?न्यूयॉर्क : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे सोमवारी सकाळी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण होणार असून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी याच आमसभेत भारताच्या निंदानालस्तीच्या केलेल्या भाषणाला त्या सडेतोड उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. स्वराज यांचे शनिवारी येथे आगमन झाले. शरीफ यांनी प्रदीर्घ काळ केलेल्या भाषणात काश्मीर प्रश्नच प्रामुख्याने होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की सगळे जग सुषमा स्वराज यांचे भाषण ऐकण्यास उत्सूक आहे. त्या यावेळी ७१ व्या आमसभेत भारताचे ‘व्हीजन डाक्युमेंट’ सादर करतील. चीन पाकिस्तानच्या पाठीशीपाकिस्तानवर कोणतेही ‘परकीय आक्रमण’ झाले तर त्या परिस्थितीत आमचा पाठिंबा तुम्हाला असेल, असे आश्वासन चीनने पाकिस्तानला दिले असून काश्मीरच्या वादावर पाकिस्तानचा जो पवित्रा आहे त्याला आपला पाठिंबा असल्याचेही म्हटल्याचा दावा प्रसार माध्यमांनी केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांची चीनचे येथील कॉन्सुल जनरल यु बोरेन यांनी भेट घेतली त्यावेळी चीनने आपला हा संदेश त्यांना दिला असे वृत्त ‘डॉन’ने दिले. पाकिस्तानवर जर परकीय आक्रमण झाले तर पाकिस्तानला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे बोरेन म्हणाल्याचे शरीफ यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 3आम्ही काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या बाजुने उभे होतो व आहोत आणि भारताच्या ताब्यातील काश्मीरमधील नि:शस्त्र काश्मिरींवर होत असलेल्या अत्याचारांचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. काश्मीरचा प्रश्न काश्मिरींच्या इच्छा आणि आकांक्षांनुसार सोडविला जावा, असे यु बोरेन म्हणाले.शरीफ यांचा हा निर्लज्जपणा न्यूयॉर्क : काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीची प्रतिक्रिया ही उरी येथील हल्ल्याने व्यक्त झाली असू शकते या निष्कर्षाबद्दल भारताने रविवारी येथे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरीफ यांचा निष्कर्ष हा काहीही उपयोगाचा नाही, असे परराष्ट्र राज्य मंत्री एम. जे. अकबर यांनी म्हटले. ते वृत्तसंस्थेशी बोलत होते. अकबर म्हणाले, ‘‘मी गुन्ह्याच्या वेळी तेथे नव्हतोच’ असे निर्लज्जपणे म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे असून ते ना न्यूयॉर्कमध्ये उपयोगाचे आहे ना लंडनमध्ये आम्ही तर असे आत्मविश्वासाने म्हणतो की त्याचा इस्लामाबादेतही उपयोग होणार नाही.