नवी दिल्ली : शेजारच्या देशाने दहशतवादाला खतपाणी देणे थांबवले नाही, तर दहशतवादाचा उगम जेथून होतो तेथे हल्ला करण्याचा हक्क भारताने राखून ठेवला आहे, अशा कठोर शब्दांत नूतन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला मंगळवारी इशारा दिला.वृत्त संस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत जनरल नरवणे म्हणाले की, सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला त्याची जागा दाखवणारी खंबीर व्यूहरचना विकसित केली गेलेली आहे. सरकारचाच पाठिंबा असलेल्या दहशतवादावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने केलेले सगळे प्रयत्न पूर्णपणे फसले असून, कलम ३७० रद्द झाल्यापासून काश्मीरमधील परिस्थितीत लक्षणीयरित्या सुधारणा झाली आहे, असे नरवणे म्हणाले.नव्या नेतृत्वात सैन्यदल नवी उंची गाठेल : रावतनवे सैन्यदल प्रमुख ले. जनरल मनोज नरवणे यांच्या नेतृत्वात सैन्य नवी उंची गाठेल, असे मत सैन्य दलाचे मावळते प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केले. देशापुढील आव्हानांचा सामना करण्यास सैन्य आता अधिक चांगल्या प्रकारे तयार आहे काय? असा सवाल केला असता जनरल रावत म्हणाले की, होय, आम्ही अधिक चांगल्या प्रकारे तयार आहोत. रावत यांना आता भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स नियुक्त करण्यात आले आहे.
'दहशतवादाच्या उगम स्थानावर हल्ला करण्याचा भारताला हक्क'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 4:05 AM