शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदी म्हणाले, "क्रिकेट असो किंवा लसीकरण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 12:10 AM

India vs England 4th test : भारतानं इंग्लंडचा पराभव करत मिळवला ऐतिहासिक विजय.

ठळक मुद्देनभारतानं इंग्लंडचा पराभव करत मिळवला ऐतिहासिक विजय.

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं भिरकावून लावलं. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह या जोडीनं ६ धावांत इंग्लंडचे चार फलंदाज माघारी पाठवले. त्यामुळे एकवेळ २ बाद १४१ अशा सुस्थितित असलेला इंग्लंडचा डाव ६ बाद १४७ असा गडगडला. हा सामना ड्रॉ करण्याचा इंग्लंडचा मानस भारतीय गोलंदाजांनी डळमळीत केला.  तळाच्या चार फलंदाजांना सोबत घेऊन ५४ षटकं खेळून काढणं हे अवघडच होतं, तरीही कर्णधार जो रूटनं १३ षटकं खेळली. पण, शार्दूल ठाकूरनं (Shardul Thakur) त्याचा त्रिफळा उडवून टीम इंडियाचा विजय पक्का केला. शार्दूलनं दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केली शिवाय गोलंदाजीतही योगदान दिलं. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात एकापेक्षा अधिक कसोटी जिंकणारा विराट कोहली हा आशियातील पहिला कर्णधार ठरला. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या.

"लसीकरणाच्या मोहिमेत आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा महान दिवस. नेहमीप्रमाणेच 'टीम इंडियाचा' विजय," असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीनं भारतीय संघाच्या विजयावर शुभेच्छा दिल्या."आप लोग रोना बंद किजिए"भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग यानंदेखील अनोख्या पद्धतीनं टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आप लोग रोना बंद किजिए असं लिहिलेलं एक मिम शेअर केलं. तसंच सोबत त्यानं एक कॅप्शनही लिहिलं आहे. 'भारत केवळ भारतातीलच टर्निग ट्रॅकवर जिंकतो त्यांच्यासाठी टीम इंडियाकडून' अशा शब्दात त्यानं सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. सचिन तेंडुलकरकडूनही शुभेच्छा"जबरदस्त पुनरागन. प्रत्येक धक्क्यानंतर सर्वांनी पुनरागमन केलं. अजून पल्ला गाठायचा आहे. ३-१ नं इंग्लंडचा पराभव करूया," असं म्हणत भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यानं म्हटलं आहे. त्यानं ट्विटरद्वारे टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघEnglandइंग्लंडSachin Tendulkarसचिन तेंडुलकर