शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताचे जाेरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 6:49 AM

भारत-पाक सीमेपासून ४० किमी अंतरावर बाडमेर जिल्ह्यातील गंधव-बखसर विभागात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वर आपातकालीन लँडिंग फिल्ड तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये महामार्गावर ‘आपातकालीन लँडिंग फिल्ड’चे उद्घाटन

लाेकमत न्यूज नेटवर्कजयपूर : पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताने संरक्षण क्षमतेचे जाेरदार प्रदर्शन केले. राजस्थानमध्ये बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्गावर तयार केलेल्या भारतातील ‘आपातकालीन लँडिंग फिल्ड’चे उद्घाटन करण्यात आले. सुखाेई व जॅग्वार या लढाऊ विमानांसह सुपर हर्क्युलस या विमानांनी महामार्गावर यशस्वी लँडिंग केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासाेबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील सुपर हर्क्युलसमध्ये स्वार हाेते.

भारत-पाक सीमेपासून ४० किमी अंतरावर बाडमेर जिल्ह्यातील गंधव-बखसर विभागात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वर आपातकालीन लँडिंग फिल्ड तयार करण्यात आले आहे. सुखाेई आणि जॅग्वार या लढाऊ विमानांचे प्रथमच महामार्गावर लँडिंग करण्यात आले. तर राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांना घेऊन सुपर हर्क्युलस हे अजस्त्र विमानही महामार्गावर उतरले. उद्घाटन समाराेहाला चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत आणि एअर चीफ मार्शल आर. के. एस. भादुरिया हेदेखील उपस्थित हाेते.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही तीन किलाेमीटरची ही धावपट्टी तयार केली आहे. त्यासाठी ३३ काेटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. सुमारे १९ महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्यात आले आहे. धावपट्टीची रुंदी ३३ मीटर आहे. 

राजस्थानमध्ये महामार्गावर ‘आपातकालीन लँडिंग फिल्ड’चे उद्घाटन

१५ दिवसांमध्ये धावपट्टी बनवू : नितीन गडकरीआपातकालीन लॅंडिंग फिल्ड बनविण्यासाठी १९ महिने लागले. मात्र, आम्ही केवळ १५ दिवसांमध्ये चांगल्या दर्जाच्या लॅंडिंग फिल्ड तयार करू, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वायुसेना प्रमुख भादुरिया यांना सांगितले. तसेच सशस्त्र दलांनी या ठिकाणी एक लहान विमानतळ तयार करायला हवे, असेही गडकरींनी बिपिन रावत यांना सांगितले. जवळपास ३५० किलाेमीटर परिसरात एकही विमानतळ नाही. त्यामुळे सशस्त्र दलांसाेबतच नागरिकांनाही फायदा हाेईल, असे गडकरी म्हणाले.

ऐतिहासिक क्षण- राजनाथ सिंहमहामार्गावर विमान उतरविणे हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अशा पद्धतीची धावपट्टी तयार केल्यानंतर भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

जर्मनी, स्वीडन, दक्षिण काेरिया, सिंगापूर, तायवान, स्वित्झर्लंड इत्यादी देशांमध्ये अशा प्रकारच्या धावपट्ट्या आहेत. उत्तर प्रदेशात लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर अशी एक धावपट्टी ऑपरेशनल आहे. त्यावर २०१७ मध्ये वायुसेनेकडून चाचणी करण्यात आली हाेती.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहindian air forceभारतीय हवाई दलNitin Gadkariनितीन गडकरी