ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 भारतीय हवाई दलाच्या दिमतीत असलेल्या अत्याधुनिक सुखोई लढाऊ विमानांपैकी एक विमान आसामधील चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळून बेपत्ता झाले आहे. मंगळवारी नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळात सुखोई-30 एमकेआय हे विमान बेपत्ता झाले. आसाममधील तेजपूरपासून 60 किमी अंतरावर असताना या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटल्याची माहिती हवाई दलातील सूत्रांनी दिली आहे.
भारतीय हवाई दलाचे सुखोई गटातील विमान आसाममधील तेजपूर भागातून बेपत्ता झाले आहे. हे विमान नियमित सरावासाठी गेले होते. या विमानात दोन विमान दोन वैमानिक होते. तेजपूरजवळून 60 किमी अंतरावर असताना या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला, अशी माहिती हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या विमानाला अपघात होऊन ते कोसळले असावे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, याचवर्षी 15 मार्च रोजी राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील शिवकार कुदला गावात सुखोई विमान कोसळले होते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 240 सुखोई विमाने होती. आतापर्यंत त्यापैकी 7 विमानांना अपघात झाला आहे.