मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अधिकतापदायक असेल. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे सरासरी कमाल तापमान सामान्यापेक्षा ०.५ ते १ अंशाने अधिक असेल. देशाच्या उत्तर पश्चिम, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात हवामान उष्ण राहील, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.फेब्रुवारीच्या अखेरीज उष्णतेच्या लाटा वाहू लागल्या आहेत. गुरुवारी सकाळीच उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, मुंबई आणि रत्नागिरीचे कमाल तापमान ३८ अंश नोंदविण्यात आले. हवामान खात्याच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर यंदा मार्च ते मे महिन्यांदरम्यान उष्णतेच्या लाटा अधिक वेगाने वाहतील.पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा तसेच महाराष्ट्राचा काही प्रदेश आणि आंध्रप्रदेशचा किनारा येथे उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसेल.अल निनो वा तत्सम घटकांमुळे तापमानात वाढ होत आहे. जमिनीसह समुद्रावरील वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणात पडणारी भर हे घटक वाढत्या उष्ण वर्षांस कारणीभूत आहेत. १९९८ सालानंतर सरासरी तापमानात सतत वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै, २०१९ हा तिसरा सर्वांत उष्ण काळ म्हणून नोंदवण्यात आला.अनेकांनी गमावला जीव२०१९ मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे बिहारमध्ये २९२ तर झारखंडमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता.
यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक; उष्णतेच्या लाटांनी देश होरपळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 3:48 AM