पिठौरागड : ‘आव्हानांनी वेढलेल्या जगात भारताचा आवाज बळकट होत आहे आणि जी-२० शिखर परिषदेदरम्यान देशाच्या सामर्थ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख झाली आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. केवळ पाच वर्षांत देशातील १३.५ कोटी जनता गरिबीतून बाहेर पडली, असेही ते म्हणाले.
येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सरकारने महिला आरक्षण विधेयकासारख्या ३० ते ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्यांवर निर्णय घेतले आहेत. त्यांनी भारताच्या यशस्वी चंद्रयान-३ मोहिमेचा संदर्भ देत म्हटले की, भारत चंद्राच्या त्या भागात पोहोचला, जिथे इतर कोणताही देश पोहोचू शकला नाही.
४२०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन- पंतप्रधानांनी उत्तराखंडमध्ये सुमारे ४२०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. - या वर्षी चारधाम यात्रेला आलेल्या भाविकांची संख्या ५० लाखांच्या आसपास आहे, असे ते म्हणाले.