नवी दिल्ली:दिल्ली विमानतळावर शुक्रवारी बंगळुरला जाणाऱ्या इंडिगो (Indigo) विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे विमानातील प्रवाशांनी आरडा- ओरड सुरू केली. यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
शुक्रवारी रात्री १०.०८ मिनिटांनी दिल्ली-बेंगळुर 6E2131 या विमानाच्या इंडिनला आग लागल्याची माहिती आयजीआयए कंट्रोल रुमला मिळाली. या विमानात एकुण १७७ प्रवासी प्रवास करत होते. तसेच विमानातील ७ कर्मचारीही होते. विमानाने उड्डाण करताच इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात आले, यानंतर लगेचच विमानाचे (Flight) लँडिंग करण्यात आले.
सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. हे विमान पुन्हा कधी उड्डाण घेणार याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. विमान रनवेवरुन उड्डाण घेत असताना इंजिनमध्ये अचानक आग लागल्याचे दिसत आहे, यावेळी ही आग पाहून प्रवासी गोंधळ करत असल्याचेही दिसत आहे. यानंतर लगेच पायलटने विमानाचे उड्डाण थांबवल्याचे दिसत आहे.
२६/११ हल्ल्याचे सूत्रधार अजूनही मोकाट कसे? परराष्ट्रमंत्र्यांचे यूनो, पाकला खडे बोल
गेल्या काही महिन्यांत देशात अनेक वेळा विमानांचे इमर्जन्सी लँडिंग झाले आहे. यात जास्त घटना या स्पाइसजेटसोबत घडल्या आहेत, पण आता इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांमध्येही तांत्रिक बिघाड दिसून येत आहे. या घटनेत आता भारताच्या फ्लाइट क्रमांक 6E-2131 मध्ये स्पार्क झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.''तांत्रिक बिघाडामुळे विमान थांबवावे लागले. सध्या विमान कंपनीकडून प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. इंडिगोने या घटनेबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे.''