बंगळुरू : तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सुरू केलेल्या अम्मा कॅन्टीनप्रमाणे कर्नाटकातही बुधवारी ‘इंदिरा कॅन्टीन’ सुरू करण्यात आली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगळुरूमधील इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन केले. या कॅन्टीनमध्ये सकाळचा नाश्ता ५ रुपयांत तर जेवण १0 रुपयांमध्ये मिळणार आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर्षी अर्थसंकल्प सादर करताना अशा प्रकारची कॅन्टीन राज्यभर सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांनी ‘अम्मा कॅन्टीन’ सुरू करण्याचे म्हटले होते; पण आमदार व काँग्रेस नेत्यांच्या आग्रहावरून त्याचे इंदिरा कॅन्टीन असे नामकरण करण्यात आले.बंगळुरूतील १५ ते २0 लाख लोकांना या कॅन्टीनचा फायदा होईल, असा विश्वास सिद्धरामय्यायांनी व्यक्त केला. नोकरीच्याशोधात बंगळुरूमध्ये येणाºयांची, सामान्य पर्यटकांचीही संख्या मोठी असते. त्यांनाही स्वस्तात दर्जेदारजेवण मिळू शकेल, असे तेम्हणाले. (वृत्तसंस्था)>निवडणुकांची तयारीपुढील वर्षी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पुन्हा काँग्रेस सरकार यावे, यासाठी सिद्धरामय्या यांनी सारी ताकद लावली आहे. दुसरीकडे भाजपानेही प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या आठवड्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकचा दौरा केला होता आणि त्या वेळी कर्नाटक विधानसभेत भाजपालाच बहुमत मिळेल, असा दावा केला होता.
कर्नाटक सरकारची आता इंदिरा कॅन्टीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 4:14 AM