- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : इंदिरा गांधी यांनी १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत देशातून दारिद्र्य निर्मुलन, सामाजिक न्याय स्थापन करणे, देश कृषी, उद्योग व तंत्रज्ञानात स्वावलंबी व्हावा व एकात्मता निर्माण करण्यासाठी खर्च केली, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. मंगळवारी गांधी यांच्या हस्ते येथे इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेसाठी टी. एम. कृष्णा यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.आज देशात राष्ट्रवादाची व्याख्या संकुचित झालेली दिसत असताना इंदिरा गांधींच्या नावाचा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिला जातो यात त्या ज्या मूल्यांसाठी लढल्या त्याला मिळालेली पावतीच आहे, असे गांधी म्हणाले.आज देशाच्या इतिहासाचे पुनर्लेखन करू इच्छिणाºयांच्या हातात देशाची सत्ता आहे. हे लोक खोटेपणा व अवैज्ञानिक कल्पना लोकांवर लादून स्वतंत्रपणे विचार करण्याची त्यांची क्षमता हिरावून घेत आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर टीका केली.आज देश वेगाने संकुचित राष्ट्रवादाच्या नावावर विभागला जात असताना इंदिरा गांधींच्या नावाने दिल्या जाणाºया पुरस्काराचेमहत्व काही वेगळेच आहे. इंदिरा गांधी यांचे जीवन व मूल्यांनी या पुरस्काराला प्रेरणा दिली. या पुरस्काराने ज्यांचा सन्मान झाला त्यांना शांतता आणि ऐक्याने प्रेरीत केले संघर्ष आणि भेदांनी नव्हे, असे गांधी म्हणाले.