नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधानद्वय इंदिरा गांधी, राजीव गांधी हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते हे बहुधा सरकारला मान्य नाही. त्यामुळेच भारतीय टपाल विभागाने या मालिकेअंतर्गत काढण्यात येणारी त्यांची टपाल तिकिटे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.माहितीच्या अधिकाराअंतर्गत (आरटीआय) दाखल अर्जामुळे हा खुलासा झाला. डिसेंबर २००८ मध्ये आधुनिक भारताचे शिल्पकार या मालिकेअंतर्गत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या स्मृतीत टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली होती. आरटीआयला मिळालेल्या उत्तरानुसार आता दीनदयाल उपाध्याय, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राममनोहर लोहिया यांच्या स्मृतीत टपाल तिकिटे काढण्याची योजना आहे. यामध्ये इंदिरा व राजीव गांधी यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यजित रे, होमी जहांगीर भाभा, जेआरडी टाटा आणि मदर तेरेसा यांची टपाल तिकिटे जारी करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इंदिरा, राजीव गांधींची टपाल तिकिटे रद्द
By admin | Published: September 16, 2015 1:43 AM