नवी दिल्ली : भारत-चीनवरील स्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. चीनने पूर्व लडाखच्या पेंगाँगच्या दक्षिण भागातील स्पांगूर गॅपमध्ये मोठ्या संख्येने सैनिक, रणगाडे व तोफा तैनात केल्या आहेत. हा भाग भारतीय सैन्याच्या रायफल रेंजच्या खूपच जवळ आहे. चीनच्या तयारीनंतर भारतानेही लष्कराला सतर्क राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील लष्करी स्तरावरील चर्चा सलग आठव्या दिवशी निष्फळ ठरली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) गुरूंग हिल व मगर हिंलमधील स्पांगूर गॅपमध्ये ३० आॅगस्टनंतर सैन्याची तैनाती सुरू केली आहे. नेमक्या याच वेळी भारताने चुशूलजवळील पेंगाँगच्या दक्षिण किनाऱ्याच्या वरील भागांवर कब्जा केला होता.सूत्रांनी सांगितले की, भारतीय लष्करानेही या भागात रणगाडे, तोफा व जवानांची तैनाती वाढवली आहे. येथे दोन्ही देश आमने-सामने आहेत. चीनने आपला मिलिशिया स्क्वॅड तैनात केला आहे. भारतीय सैन्याला मागे हटवण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे, असे समजते. हा पीएलएचा राखीव दल असून, हे जवान पर्वतारोही, ठोसेबाजी व स्थानिक फाईट क्लबचे सदस्य आहेत. उंच भागावरील ठिकाणी पीएलएला हे मदत करतात.चार तासांची चर्चा निष्फळपूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीन यांच्यात शनिवारी झालेली लष्करस्तरीय बैठक पुन्हा निष्फळ ठरली. दोन्ही देश जेथे आमने-सामने आहेत, तेथून मागे हटण्यावर ही चर्चा झाली.
भारत-चीनचे सैनिक स्पांगूर गॅपमध्ये आमने-सामने; चार तासांची चर्चा निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 5:51 AM