किशनगंज -भारत-नेपाळ तणावाचा परिणाम आता सीमावर्ती भागांतील नागरिकांवरही होऊ लागला आहे. बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेवर शनिवारी रात्रीच्या सुमारास, नेपाळ पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांवर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या युवकाचे नाव जितेंद्र कुमार सिंह, असे आहे. जितेंद्र खनियाबाद पंचायतीतील माफी टोलाचे रहिवासी आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यांना सर्वप्रथम टेढागाछच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेले. येथून त्यांना चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जखमी जितेंद्र कुमार सिंह यांच्यावर आता पूर्णिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किशनगंजचे एसपी कुमार आशीष म्हणाले, नेपाळ पोलिसांकडून किशनगंजमध्ये भारत-नेपाळ सीमेजवळ तीन भारतीय नागरिकांवर गोळीबार केला गेला. नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय नागरीक गंभीर जखमीझाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर स्थानिक पोलीस आणि एसएसबी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेवर पोलीस नजर ठेऊन आहेत.
जून महिन्यातही नेपाळ पोलिसांनी गोळीबार केला होता. ते नागरिक भारतीय हद्दीतच होते. तेव्हा एकाचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी मृतदेह सीमेवर ठेवून आंदोलन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या -
चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात
पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!
बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत
Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट
चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप