शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

भारत-पाक मैत्रीचा सेतू संवादातूनच

By admin | Published: June 04, 2016 3:48 AM

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत ही तेथील जनतेचीदेखील इच्छा आहे. दोघांमधील संबंध सुधारण्यासाठी चर्चा आवश्यक आहे. युद्धामुळे आणखी नव्या समस्या निर्माण होतात.

नागपूर : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत ही तेथील जनतेचीदेखील इच्छा आहे. दोघांमधील संबंध सुधारण्यासाठी चर्चा आवश्यक आहे. युद्धामुळे आणखी नव्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे चर्चेतूनच विविध वादांवर तोडगा काढला जाऊ शकतो व शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे मत पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘लोकमत नॉलेज फोरम’अंतर्गत आयोजित ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रादरम्यान मुख्य वक्ता म्हणून ते शुक्रवारी बोलत होते. भारत आणि पाकिस्तानदरम्यान चालणाऱ्या शांतिप्रक्रियेला वैचारिक बळ प्रदान करण्यासाठी आयोजित या चर्चासत्राला थायलंड, म्यानमार व अफगाणिस्तान येथील भारताचे माजी राजदूत विवेक काटजू, भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी, काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई हे प्रामुख्याने उपस्थित होते.भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर काही वर्षांतच हे देश एकत्र येतील, असे अनेकांना वाटायचे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये पाकिस्तानने फार वेगाने प्रगती केली. १९७०च्या दशकात पाकिस्तानचा विकास दर भारत आणि चीनपेक्षा जास्त होता. परंतु दहशतवादामुळे आमचे फार नुकसान झाले, असे अब्दुल बासित म्हणाले.भारत-पाकिस्तानदरम्यान शांतिचर्चा होणे आवश्यक आहे. चर्चेतून प्रश्न सुटू शकतात व भारत सर्व मुद्यांवर बोलण्यास तयार आहे. पाकिस्तानमधील काही शक्तींना वाटते की चर्चा व्हायला नको आणि तेथील अस्थिर व्यवस्थेमुळे नेमके कुणाशी बोलावे असा भारतासमोर संभ्रम निर्माण होतो, असे प्रतिपादन शेषाद्री चारी यांनी केले.उभय देशांत शांतता प्रस्थापित होण्यासाठी संगीत, कविता, साहित्य यांचा काहीच उपयोग नाही. तसेच हिंसा व युद्ध हा देखील पर्याय नाही. दोन्ही देशांनी त्यांचे समान हित कशात आहे, हे शोधून वाटचाल करणे हाच शांतता निर्माण करण्याचा उपाय आहे, असे स्पष्ट मत विवेक काटजू यांनी व्यक्त केले. गेल्या ६९ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करायला हवा. संबंध सुधारण्यासाठी चर्चेसोबतच हिंदी सिनेमा, संंस्कृती यांच्यासारख्या बाबींचादेखील उपयोग व्हायला हवा, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.दोन्ही देशांना जवळ आणण्यासाठी जनतेमधील परस्पर संबंध वाढवायला हवे. नागरिकांना मिळणाऱ्या ‘व्हिसा’ची संख्या वाढवायला हवी. यासाठी जनतेनेही दबाव आणण्याची गरज आहे, असे जतीन देसाई यांनी सांगितले. भांडणातून या दोन्ही देशांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. संवाद आणि चर्चेतूनच भारत-पाकदरम्यान संबंध सुधारू शकतात, असे मत लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविकादरम्यान व्यक्त केले.‘लोकमत’चे ‘नॅशनल एडिटर’ हरीश गुप्ता यांनी यावेळी जनतेच्यावतीने मान्यवरांना विविध प्रश्न विचारले. ‘लोकमत समाचार’चे ‘प्रॉडक्ट हेड’ मतिन खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्रा यांनी आभार मानले. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अब्दुल बासित यांनी कौतुक केले. विजय दर्डा हे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासोबत मोरोक्को दौऱ्यावर असल्यामुळे ते उपस्थित नाहीत. त्यांची अनुपस्थिती जाणवते आहेच. विजय दर्डा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना दोन्ही देशांनी एकत्रित येऊन एका मनोरंजन वाहिनीची सुरुवात करावी, अशी सूचना केली होती. त्यांच्या या सूचनेचे स्वागत करून यासाठी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी यांना भारताच्या फाळणीचा निर्णय मंजूर नव्हता. त्यांनी याला विरोधदेखील केला होता. याशिवाय जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांनीसुद्धा फाळणीच्या निर्णयाला विरोध केला होता, असे वक्तव्य शेषाद्री चारी यांनी केले.