शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 2:00 AM

१,१०० टन कचरा : शंभर टक्के प्रक्रिया, कॅरिबॅगपासून डस्टबीन, सीएनजी गॅसनिर्मिती

- मुजीब देवणीकर औरंगाबाद : इंदूर शहराच्या साफसफाईवर महापालिका दरवर्षी १५२ कोटी रुपये खर्च करते. शहरातील ३२ लाख नागरिक कचरा संकलनासाठी दररोज दोन रुपये देतात. ३० कोटी रुपये साफसफाईचा भार सर्वसामान्य नागरिक उचलतात. शहरात दररोज १,१०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. त्यावर शंभर टक्केप्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येते. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने१५० कोटींची अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे.इंदूरच्या देवपुरिया भागात पूर्वी कचºयाचा डोंगर साचला होता. या कचºयावर प्रक्रिया करून मनपाने स्वतंत्र अत्याधुनिक यंत्रणेचे केंद्र उभारले. दिवसभरात जमा होणाºया १,१०० मेट्रिक टन कचºयापासून यशस्वीपणे खतनिर्मिती करण्यात येते. पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या आनंदाने हे खत ३ रुपये किलो दराने ५० किलोची बॅग खरेदी करतात.इंदूर शहरातील ८५ वॉर्डांचा कचरा मनपा ८ ट्रान्स्फर सेंटरवर जमा करते. तेथून तो देवपुरिया येथे प्रक्रियेसाठी नेण्यात येतो. याशिवाय बांधकाम साहित्यासाठी दोन स्वतंत्र ट्रान्स्फर सेंटर आहेत. बांधकाम साहित्यापासून विटा, पेव्हरब्लॉक तयार करण्याचे कामही मनपा करते. शहरातील प्रत्येक फूटपाथवर मनपाने तयार केलेले पेव्हरब्लॉक वापरण्यात येतात. शहरातील बांधकाम साहित्य उचलण्यासाठी मनपा संबंधित नागरिक, बिल्डरला आर्थिक दंड आकारते. विशेष बाब म्हणजे कचरा उचलणे, त्यावर प्रक्रिया करणे, बांधकाम साहित्यापासून विटा, पेव्हरब्लॉक तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे. हे वैभव मनपाने उभारल्याचे पाहत आपण भारतात आहोत का? असा प्रश्न पडतो.कचरा वेचकांना रोजगारदेवपुरिया भागात सुका कचरा वेगळा टाकण्यात येतो. येथे ४३३ कचरा वेचक येतात. त्यांना येण्या-जाण्यासाठी मनपाने स्वतंत्र दोन बस दिल्या आहेत. एक कचरा वेचक दिवसभरातून कॅरिबॅग, पत्रा, लोखंड, प्लास्टिक आदी साहित्य वेगळा करतात. जागेवरच त्याने वेचलेले साहित्य एक व्यापारी खरेदी करतो. एका कचरा वेचकाला दिवसभरातून पाचशे ते सहाशे रुपये मिळतात. शहरातील कचराकुंड्यांवर भटकंतीची वेळ वेचकांवर येत नाही, असे कार्यकारी अभियंता पी.एस. खुसवा यांनी सांगितले. शहरातून जमा होणारे सॅनेटरी नॅपकिन, डायपर यावरही स्वतंत्र यंत्रणेद्वारा प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान मनपाने उभारले आहे.सीएनजी गॅस : इंदूर शहरातील सर्वात मोठ्या भाजीमंडईच्या बाजूला महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने सीएनजी प्लँट उभारला आहे. भाजीमंडईतील कचºयापासून दररोज ८०० टन सीएनजी गॅस तयार करण्यात येतो. या गॅसवर मनपाच्या आठ बसेस चालतात. कंपनी मनपाला ५३ रुपये किलो दराने गॅस विकते. या प्रकल्पात मनपाचे ७ कोटीची, कंपनीची अडीच कोटींची गुंतवणूक असल्याचे प्रकल्प मॅनेजर व्यंकटकृष्ण किशोर यांनी सांगितले.कॅरिबॅगपासून डस्टबीनमहापालिका कॅरिबॅगपासून डस्टबिन तयार करते. हे काम स्वत: महापालिका करते. कॅरिबॅग जाळून प्लास्टिकचे गोळे तयार करण्यात येतात. प्लास्टिक पाईप तयार करण्यासाठी या गोळ्यांना बरीच मागणी आहे. मनपाकडून तयार करण्यात येणारे डस्टबिन नागरिकांना मोफत देण्यात येतात, हे विशेष.गार्डन वेस्टसाठी प्लँट : शहरातील झाडांच्या फांद्या, पालापाचोळा, मनपाच्या सर्व उद्यानांमधील पालापाचोळा एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा स्वतंत्र प्लँट उभारला आहे. येथेही खतनिर्मिती करून हे खत मनपाच्याच उद्यानांसाठी वापरण्यात येते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशGarbage Disposal Issueकचरा प्रश्न