कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 10:30 AM2020-05-21T10:30:08+5:302020-05-21T10:35:38+5:30

कुटुंबातील तिघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र यानंतरही कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला. 

indore husband wife and son hospitalized together death of husband and son SSS | कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना

कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना

googlenewsNext

इंदूर - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. इंदूरमधील एक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 15 दिवसांपूर्वी इंदूरमध्ये राहणारे संपूर्ण मनवानी कुटुंब सर्दी, खोकला आणि तापामुळे हैराण झाले होते. पती, पत्नी आणि मुलगा यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनाची लक्षणं असल्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली. मात्र तिघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र यानंतरही कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला. 

कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही रविवारी मुलगा विनोद याचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी दु:खात मुलावर अंत्यसंस्कार केले. मुलाच्या जाण्याचं दु:ख पचवण्याआधीच कुटुंबावर आणखी एक संकट आलं. सोमवारी रमेशलाल मनवानी यांचा मृत्यू झाला. तर त्याच दिवशी पत्नी अनिता या बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. मनवानी कुटुंब अगदी आनंदात राहत होतं. मात्र आजारी असल्याने उपचारासाठी हे कुटुंब रुग्णालयात दाखल झालं.

 

रुग्णालयात हे कुटुंब एकमेकांना धीर देत होते. मात्र याच दरम्यान वडील आणि मुलाची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. न्यूमोनियाच्या लक्षणांच्या आधारे या दोघांवर उपचार केले जात होते. मुलगा विनोद यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबातील काही सदस्य आले. यानंतर रमेशलालच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. विनोदच्या अंत्यसंस्काराचे दु:ख पचवण्याआधीच विनोदच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांना जावं लागलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरल

Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान

CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहात किती वेळ जिवंत राहतो व्हायरस?; ICMR ने दिलं उत्तर

CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित

CoronaVirus News : धोका वाढला! 4 दिवसांत 400 नवे रुग्ण; 'या' राज्यात येणारी चौथी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

बाप रे बाप! 8 दिवसांत घरातून निघाली सापाची तब्बल 123 पिल्ले; लोकांचा उडाला थरकाप

Web Title: indore husband wife and son hospitalized together death of husband and son SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.