मध्य प्रदेशात डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी 7 जणांना अटक, महिला डॉक्टरने सांगितले नेमके काय घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 03:26 PM2020-04-02T15:26:44+5:302020-04-02T15:43:29+5:30
इंदूरमध्ये बुधवारी एका महिलेची तपासणी करण्यासठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या चमूवर लोकांनी दडगफेक केली होती. इंदूरमध्ये ताटपट्टी भक्खल येथे आरोग्य सेवक कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीची तपासणी करण्यासाठी गेले होते.
इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये संभाव्य कोरोना बाधितांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांचा तपास सुरू केला होता. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील लोकांची ओळख पटली आहे.
इंदूरमध्ये बुधवारी एका महिलेची तपासणी करण्यासठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या चमूवर लोकांनी दडगफेक केली होती. इंदूरमध्ये ताटपट्टी भक्खल येथे आरोग्य सेवक कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीची तपासणी करण्यासाठी गेले होते. मात्र स्थानिक लोकांनी उलट त्यांच्यावर डगडफेक केली. या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. येथे कुणीही कोरोनाग्रस्त नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते.
महिला डॉक्टरने सांगितले नेमके काय घडले -
चमूतील एका महिला डॉक्टरने सांगितले, की आरोग्य विभागाने त्यांना स्क्रीनिंगसाठी तेथे पाठवले होते. आम्ही गेल्या तीन दिवसांपासून तेथे जात आहोत. आम्हाला एका व्यक्तीची कोरोना कॉन्टेक्टची हिस्ट्री मिळाली होती. त्यामुळे आम्ही तेथे गेलो होते. यासंदर्भात आम्ही विचारायला सुरुवात करतात तेथील नागरिकांनी आमच्यावर दगडफेक सुरू केली. तीन डॉक्टर एएनएम आणि आशा कार्यकर्तादेखील तेथे गेल्या होत्या. एवढेच नाही, तर त्यांच्यासोबत तहसीलदारही गेले होते. पोलीस होते म्हणून आम्ही वाचलो.
मुंगेरमध्येही डॉक्टरांवर हल्ला -
मुंगेरमध्येही बुधवारी संभाव्य कोरोना बाधिताची तपासणी करायला गेलेल्या डॉक्टरांवर हल्ल्याची घटना घडली. येथे एका मुलीच्या मृत्यूनंतर, तिच्या कुटुंबीयांना होम क्वारंटान ठेवण्यासाठी आणि तपासणीसाठी हा चमू तेथे गेला होता. येथे गडबड सुरू होताच पोलिसांना पाचारण करण्यात आले होते, मात्र स्थानिक लोकांनी त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. यापूर्वी बिहारमध्ये कोरोना तपासणीसंदर्भात अनेक ठिकांणी डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत.