'प्रज्ञा ठाकूर यांची भाजपा हकालपट्टी करणार का?', गांधी जयंतीवरून 'पोस्टर वॉर'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:07 IST2019-10-02T14:07:01+5:302019-10-02T14:07:36+5:30
इंदोरमध्ये आनंद असो किंवा दु:ख, स्वागत असो किंवा विरोध...राजकीय पक्षांचे कार्यकर्ते शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावून आपल्या भावना व्यक्त करतात.

'प्रज्ञा ठाकूर यांची भाजपा हकालपट्टी करणार का?', गांधी जयंतीवरून 'पोस्टर वॉर'!
इंदोर : मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये महात्मा गांधींच्या जयंती निमित्त पोस्टरच्या माध्यमातून भाजपा आणि भोपाळतच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहेत. भाजपा प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पार्टीतून हकालपट्टी करणार का? असा सवाल या पोस्टरवर करण्यात आला आहे. हे पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावल्याचे सांगण्यात येत आहे.
इंदोरमधील चौकात पोस्टर लावण्यात आले. त्यानंतर लगेच यावर चर्चा झाली. या पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा फोटो आहे. महात्मा गांधींच्या फोटोखाली अहिंसाचे पुजारी अशी कॅप्शन लिहिली आहे. तर, प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या फोटोखाली हिंसेची पूजा करणारी अशी कॅप्शन लिहिली आहे. तसेच, पोस्टरवर लिहिले आहे की, गोडसेला मानणारी पार्टी भाजपा प्रज्ञा सिंह ठाकूर यांची हकालपट्टी करणार का? गांधी जयंतीवर फसवूक करणाऱ्या भाजपाने उत्तर द्यावे.
दरम्यान, पोस्टर लावण्यात आल्याचे समजताच पोलिसांनी हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इंदोरमध्ये आनंद असो किंवा दु:ख, स्वागत असो किंवा विरोध...राजकीय पक्षांचे कार्यकर्ते शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावून आपल्या भावना व्यक्त करतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेता कैलाश विजयवर्गीय आणि गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या 'बॅटकांड' वरून त्यांच्या आमदार मुलगा आकाश विजयवर्गीय यांचेही पोस्टर लावण्यात आले होते.