नवी दिल्ली - बालपणी सर्व जण कागदाचं विमान उडवतात. ते उडवताना खऱ्या विमानात बसण्याचं स्वप्न देखील हमखास पाहिलं जातं. मुलांचं हेच स्वप्न एका मुख्याध्यापकांनी खरं केलं आहे. ट्रेननेही प्रवास न केलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी स्वखर्चाने हवाई सफर घडवली आहे. मध्यप्रदेशच्या इंदौरमधील देवास जिल्ह्यात एक सरकारी शाळा आहे. येथील विद्यार्थ्यांचं विमानात बसण्याचं स्वप्न मुख्यध्यापकांनी पूर्ण केलं आहे. सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.
किशोर कनासे असं मुख्याध्यापकांचं नाव असून त्यांनी 19 विद्यार्थ्यांना हवाई सफर घडवली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या खर्चाने विद्यार्थ्यांना विमानाने दिल्ली फिरवून आणली आहे. यासाठी त्यांना 60 हजार रुपये खर्च आला. त्यांनी आपल्या बचत खात्यामधून मुलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. बिजापूर गावातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी इंदौर ते दिल्ली अशी हवाई सफर घडवली.
सहावीत शिकणारा तोहिद शेख यांने 'आम्ही मैदानामधून आकाशात उडणारे विमान पाहायचो तेव्हा ते अगदी लहान दिसायचे. मात्र आम्ही जेव्हा खरं विमान पाहिलं तेव्हा ते खूपच जास्त मोठं होतं' असं म्हटलं आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांनी ट्रेननेही कधी प्रवास केलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी विमानाने देखील प्रवास करण्याचा स्वप्नात विचार केला नसेल. त्यामुळेच विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती किशोर यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना हवाई सफर घडवण्याची कल्पना डोक्यात आली होती. मात्र त्यावेळी पैसे नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ट्रेनने आग्रा येथे घेऊन गेलो. मुलांना खूप आनंद झाला. त्यावेळीच त्यांनी पुढच्या वेळी आम्हाला विमानाने प्रवास करायचा आहे असं सांगितल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. पहिल्यांदाच विमानाने प्रवास केल्याने मुलं अत्यंत आनंदी झाली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, 37 पोलीस गंभीर जखमी
China Coronavirus : दक्षिण कोरियात रेड अलर्ट! 'कोरोना'मुळे तब्बल 2,592 जणांचा मृत्यू
Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींच्या विमानात 'हा' आहे फरक