इंदूर : तरूणानं ऑनलाइन विष मागवून केली आत्महत्या; पालकांची Amazon विरोधात पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 04:47 PM2021-08-21T16:47:18+5:302021-08-21T16:48:30+5:30
मुलाचा फोन तपासल्यानंतर समोर आली धक्कादायक बाब. पालकांनी याविरोधात केली पोलिसांत तक्रार.
काही महिन्यांपूर्वी इंदूर येथे राहणाऱ्या एका तरूणानं विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान, त्या तरूणानं विष Amazon वरून मागवल्याची माहिती समोर आली. मुलाच्या आई-वडिलांनी त्याचा मोबाईल जेव्हा तपासला त्यावेळी ही धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर तरूणाच्या आई-वडिलांनी Amazon विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केला आहे.
इंदूरमधील लोढा कॉलनीमध्ये राहणाऱ्या आदित्य नावाच्या एका तरूणानं २० जुलै रोजी विष खरेदी केलं होतं. परंतु २२ जुलै रोजीही पेमेंट न झाल्यानं ऑर्डर रद्द करण्यात आली. यानंतर २८ जुलै रोजी त्यानं पुन्हा एकदा Amazon वरून ऑनलाइन विष खरेदी केलं. आदित्यचे वडिल रंजीत वर्मा यांनी कंपन्या योग्य प्रकारे काम करत नसल्याचा आरोप केला आहे. तसंच यावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. खाण्यापिण्याच्या आणि वापरण्याच्या वस्तूंबाबतही कंपनी योग्य प्रकारे काम करत नाहीत. तसंच या प्रकारे चिनी बनावटची हत्यारं आणि विषारी वस्तूंच्या प्रकरणी कारवाई आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
२९ जुलै रोजी तरुणानं विष घेतलं होतं. परंतु कुटुंबीयांना त्याची तब्येत बिघडल्याचं समजताच त्याला चोइथराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी ३० जुलै रोजी त्या मृत घोषित करण्यात आलं. सुरुवातीच्या तपासात त्यानं विष घेतल्याचं मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. तरूणाचे आई-वडिल भाज्या आणि फळ विक्रीचा व्यवसाय करतात. तरूणाचंही फळ विक्रीचंच एक दुकान होतं. जेव्हा तरूणाच्या मृत्यूनंतर ओळखीच्यांनी सामानाचा शोध घेतला तेव्हा चारपैकी एक पावडरचं पॅकेट सापडलं.