Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर कोणताही आडपडदा न ठेवता भारताने हल्लेखोरांना पाकिस्तानचा असलेला थेट पाठिंबा यावरुन प्रहार केला. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर थेट आरोप केला आहे. भारताने पाकिस्तानी दूतावास बंद करण्यास सांगितल असून पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.
अटारी बॉर्डर बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 21:26 IST