नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज उद्योगजगतातून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. ही काळाची गरज असल्याचेही उद्योगजगतानं सांगितलं आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराने घसरलेली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यास मदत होईल. तसेच लॉकडाऊन घालण्यात आलेल्या निर्बंधानंतरही अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणं शक्य होणार आहे. आर्थिक प्रगतीला नवीन गती मिळणार आहे, असं मत उद्योग मंडळानं व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.त्यानंतर आनंद महिंद्रा यांनीसुद्धा ट्विट करत पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केले की, 'पंतप्रधानांचे कार्पे डायम (दिवस जप्त करणारं) भाषण होतं, संधीच्या रुपातून जगण्याच्या प्रयत्नांचा दृष्टिकोन बदलेल अन् त्याला सामर्थ्याचं रूप प्राप्त होईल. हा बदल 1991च्या धर्तीवर होईल की नाही याची आम्हाला उद्या (बुधवारी) खात्री पटेल. पण आज रात्री मला नीट झोप येणार नाही, असे मला वाटते.
Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 8:19 AM
पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.
ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज उद्योगजगतातून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराने घसरलेली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यास मदत होईल