ऑनलाइन लोकमतपटना, दि. 23 - दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती बिहारच्या मोतिहार या जिल्ह्यात घडली आहे. एक 21 वर्षीय तरुणीवर अज्ञातांनी बंदूक दाखवून सामूहिक बलात्कार केला. मात्र हे नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी चक्क त्या मुलीच्या गुप्तांगामध्ये बंदूक आणि लाकडी वस्तू घुसवल्या आहेत, असं वृत्त 'डेक्कन क्रोनिकल'नं दिलं आहे. या मुलीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यातल्या एका नराधमानं या बलात्काराचे व्हिडीओ चित्रीकरणही केले आहे. या चित्रीकरणाद्वारे ते मुलीला ब्लॅकमेलही करत होते. तसेच आरोपींनी बलात्कारानंतर बेदम मारहाण केल्याची कबुली या पीडितेनं दिली आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर प्रकारामुळे बिहारमधल्या नागरिकांमध्ये भीती पसरली असून, एकच खळबळ उडाली आहे.
बलात्कारानंतर तरुणीवर केले अनन्वित छळ
By admin | Published: June 23, 2016 5:15 PM