मुंबई - सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही खाद्यतेलाच्या किमतीत वाढ सुरूच आहे. खाद्यतेलाचे भाव सण संपल्यानंतर कमी होतात. मात्र, यावेळी कच्च्या तेलाच्या दरवाढीचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले भाव आहे. याचं कारण रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव असल्याचं बोललं जात आहे. व्यापार्यांच्या म्हणण्यानुसार खाद्यतेलाचे दरही जागतिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. मात्र, सणासुदीचा हंगाम नुकताच संपला तेव्हा मागणी वाढली होती.
त्याचबरोबर आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने हीच मागणी कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती वाढणे साहजिक आहे. पण बाजारात भरपूर तेल उपलब्ध आहे. गेल्या महिनाभरात देशात खाद्यतेलाच्या किमती १५ ते ३० रुपयांनी वाढल्या आहेत. महिन्याभरात रिफाइंड सोयाबीन तेलाचा घाऊक भाव १२०-१२५ रुपयांवरून १४०-१४५ रुपये, मोहरीचे तेल १३०-१३५ रुपयांवरून १४५-१५० रुपये, सूर्यफूल तेल १३०-१३५ रुपयांवरून १६०-१६५ रुपये लिटर झाले. या दरम्यान आयात केलेल्या पामोलिन तेलाचे दर ९० ते ९५ रुपयांवरून १०५ ते ११० रुपये प्रति लिटर झालेत.
सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑइल इंडस्ट्री अँड ट्रेडशी संबंधित व्यापाऱ्यांनी सांगितले की, रशिया-युक्रेनमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारतातील खाद्यतेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारावर बरीच अवलंबून असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेजीमुळे देशात खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. एका महिन्यात खाद्यतेलाच्या दरात १५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.
तर सणासुदीच्या काळात मागणीमुळे दिवाळीनंतर खाद्यतेल स्वस्त होण्याची अपेक्षा होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने देशांतर्गत बाजारातही खाद्यतेल महाग झाले आहे. रशिया-युक्रेनमधील तणाव वाढल्याने सूर्यफूल तेलात सर्वाधिक २५ टक्के वाढ झाली आहे. युक्रेनमधून सूर्यफूल तेल भारतात मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते असं फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्सशी संबंधित लोकांनी सांगितले
खाद्यतेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतील, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. जर रशिया-युक्रेन आणि इतर देशांदरम्यान तणावाची परिस्थिती असेल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती थोडी शांत झाली आहे. हीच परिस्थिती पुढे चालू राहिल्यास अपट्रेंड थांबू शकतो आणि उतरती कळा देखील शक्य आहे. तणाव वाढल्याने किंमती वाढण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारावर पूर्णपणे नियंत्रणात असतात. तिथे किंमत पडल्यावर कमी होईल आणि वाढल्यावर वाढेल असं ठक्कर सांगतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"