मोदी सरकार या टर्ममधील शेवटचा अर्थ संकल्प सादर करणार आहे. याअगोदर देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे. आयएमएफने जारी केलेल्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा महागाई दर ६.८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर येऊ शकतो. २०२४ मध्ये ते ४ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वतीने एक अहवाल जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
'इतर देशांप्रमाणेच भारतातील महागाई २०२२ मध्ये ६.८ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ५ टक्क्यांवर येण्याची अपेक्षा आहे. २०२४ मध्ये ते आणखी ४ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, असं IMF च्या संशोधन विभागाचे विभाग प्रमुख डॅनियल लेह यांनी म्हटले आहे.
उद्यापासून बदलणार 'हे' मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; पाहा काय आहेत बदल?
'जागतिक आर्थिक परिस्थिती' संदर्भात एक अहवाल जारी करण्यात आला आहे. यानुसार, सुमारे ८४ टक्के देशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ कमी होईल, असंही यात म्हटले आहे.
'जागतिक चलनवाढ २०२२ मध्ये ८.८ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ६.६ टक्के आणि २०२४ मध्ये ४.३ टक्क्यांवर येईल. कोरोना अगोदर ते सुमारे ३.५ टक्के होते.
जागतिक मागणीमुळे परिणाम दिसून येईल चलनवाढीचा अंदाज कमी होण्याचा अंदाज अंशतः आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किमतीतील घट आणि कमकुवत जागतिक मागणीमुळे इंधन नसलेल्या किमतींवर आधारित आहे. चलनवाढ २०२२ च्या चौथ्या तिमाहीत ६.९ टक्क्यांवरून वार्षिक आधारावर २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ४.५ टक्क्यांवर येईल, असंही याच म्हटले आहे.