फराज अहमद, नवी दिल्ली नव्या सरकार पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारी होत असताना सरकार आणि काँग्रेस यांच्यामध्ये विरोधीपक्ष नेतेपदावरून तणाव निर्माण झाला आहे. सरकारने काँग्रेसला सर्वांत मोठा गट म्हणून विरोधी पक्षाचा दर्जा देण्यास नकार दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर महागाईच्या मुद्द्यावर संसदेत सरकारची पुरती कोंडी करण्याचा चंग काँग्रेससह सर्व विरोधकांनी बांधला आहे. संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी प्रारंभी विरोधीपक्ष नेतेपदासाठी निर्णय लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर सोपवला. परंतु त्यांच्याकडे पुन्हा विचारणा केली असता त्यांनी काँग्रेसविरुद्ध बाह्णा सरसावल्याचे दिसून आले.काँग्रेस नेते शकील अहमद यांनी विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला न मिळाल्यास सभागृहात कामकाज होऊ दिले जाणार नाही, असा इशारा दिला. यासंदर्भात नायडू यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, त्यांनी अडथळा निर्माण केल्यास सभागृह कसे चालवायचे आम्हाला माहीत आहे. हा जनतेचा फैसला आहे आणि घटनेशी संबंधित विषय आहे. अध्यक्षांच्या निर्णयाचे पालन केले जाईल, असेही ते म्हणाले. संसदेच्या अधिवेशनात महागाईच्या मुद्यावर मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने महागाई हा कळीचा प्रचार मुद्दा बनवला होताÞ आता याच महागाईवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी महागाई, रेल्वे भाडेवाढ, तामीळ मच्छीमारांच्या समस्या, संघर्षरत इराकमध्ये फसलेले भारतीय अशा अनेक मुद्यांवर चर्चेची मागणी केली आहे. हे अधिवेशन १४ आॅगस्टर्पयत चालेल. त्यात १६८ तास कामकाज होणे अपेक्षित आहे.
सरकारची महागाईवरून होणार कोंडी !
By admin | Published: July 07, 2014 4:17 AM