मुंबई : ‘अॅमेझॉन’च्या या इ-कॉमर्समधील काही वापरकर्त्यांची माहिती फुटली आहे. कंपनीने तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली पण यामुळे आॅनलाइन बाजार पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.अॅमेझॉनवर कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यासाठी वापरकर्त्याला स्वत:चा इ-मेल आयडी द्यावा लागतो. या आयडीच्या आधारे अॅमेझॉनचा स्वतंत्र तयारआयडी तयार होतो. पण कंपनीच्या चुकीमुळे जगभरातील काही वापरकर्त्यांचा हा इ-मेल आयडी व अॅमेझॉन आयडी फुटला आहे. याची चोरी झाली असण्याची शक्यता आहे. ज्या वापरकर्त्यांचे आयडी फुटले आहेत त्यांचे अॅमेझॉन खाते सुरक्षित आहे व नव्याने पासवर्ड तयार करण्याची गरज नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)
‘अॅमेझॉन’च्या वापरकर्त्यांची माहिती फुटली; कंपनीकडून दिलगिरी व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 2:47 AM