शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
2
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
3
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
4
Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
5
Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: आज क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन'
6
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
7
Tulasi Vivah 2024: आजपासून तुलसी विवाहारंभ; जाणून घ्या विधी, मुहूर्त आणि आख्यायिका!
8
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
9
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
10
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
11
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
12
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
13
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
14
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
15
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
16
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
17
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
18
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
19
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
20
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!

जयललितांच्या प्रकृतीची माहिती द्या

By admin | Published: October 05, 2016 4:55 AM

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन प्रसृत केल्यामुळे लोकांची काळजी कमी होईल, असे निरीक्षण नोंदवून मद्रास उच्च न्यायालयाने

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन प्रसृत केल्यामुळे लोकांची काळजी कमी होईल, असे निरीक्षण नोंदवून मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारपर्यंत या मुद्यावर म्हणणे मांडण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. जयललिता यांच्यावर येथील एका रुग्णालयात २२ सप्टेंबरपासून उपचार सुरू आहेत. सरकारने जयललिता यांच्या प्रकृतीची माहिती द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते ‘ट्राफिक’ रामास्वामी यांनी दाखल केली असून, या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील तोंडी निरीक्षण नोंदविले. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत सरकारशी चर्चा करून उद्यापर्यंत सरकारचे म्हणणे मांडा, असे निर्देश न्यायालयाने तामिळनाडूचे अतिरिक्त महाधिवक्ता सी. मणिशंकर यांना दिले. रुग्णालय जयललिता यांच्या प्रकृतीबाबत दररोज मेडिकल बुलेटिन जारी करीत असून, त्यात त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचाराचीही माहिती असते, असे मणिशंकर यांनी न्यायालयाला सांगितले. तथापि, रुग्णालय जरी मेडिकल बुलेटिन जारी करीत असले तरी त्या राज्याच्या मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केल्यास लोकांची काळजी कमी होईल, असे मत न्यायालयाने नोंदविले. रुग्णालयात जयललितांनी घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे फोटोही जारी करण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)