नवी दिल्ली : अपघातातील रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी खासगी डॉक्टरांना मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्रीनितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.या संदर्भात तृणमूल काँग्रेसच्या शांता छेत्री यांनी प्रश्न विचारला होता. देशात दरवर्षी ५ लाखांवर अपघात होतात व या अपघातांमध्ये दीड लाख लोकांना जीव गमवावा लागतो. हे प्रमाण कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या अपघातातील रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी केवळ सरकारी रुग्णालयांवर अवलंबून न राहता, काही खासगी ट्रॉमा सेंटर उभारण्याचा प्रस्तावावर निश्चितपणे विचार केला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी काश्मीरमध्ये बेरोजगारी वाढत असून, विकासापासून अजूनही दूर आहे. यावर उत्तर देताना राय म्हणाले, जम्मू व काश्मीरमध्ये ५१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, यातून १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
राज्यसभा प्रश्नोत्तरेमनरेगाच्या मजुरीत वाढदेशात मनरेगा योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या दरवर्षी वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंह यांनी दिली. या संदर्भात काँग्रेसचे शक्तीसिंग गोहील यांनी प्रश्न विचारला होता. मजुरीचे दर ठरविण्यासाठी काही निकष आहेत.