झाडे जगविण्याबाबतची माहिती पालिकेेकडून मिळेना
By admin | Published: June 19, 2016 12:18 AM
जळगाव : महापालिकेने ज्यांना झाडे तोडण्याची रितसर परवानगी दिली त्यांनी निर्देशानुसार प्रत्येकी पाच झाडे जगविली की नाही याची खात्री पालिकेने केलेली नाही. त्यामुळेच की काय याबाबतची माहिती पालिकेतील वृक्ष प्राधिकरण समितीमधील सदस्यांनाही पालिका दऊ शकत नसल्याचे चित्र आहे.
जळगाव : महापालिकेने ज्यांना झाडे तोडण्याची रितसर परवानगी दिली त्यांनी निर्देशानुसार प्रत्येकी पाच झाडे जगविली की नाही याची खात्री पालिकेने केलेली नाही. त्यामुळेच की काय याबाबतची माहिती पालिकेतील वृक्ष प्राधिकरण समितीमधील सदस्यांनाही पालिका दऊ शकत नसल्याचे चित्र आहे. माहितीच मिळत नसल्याने शेवटी नगरसेवक तथा वृक्ष प्राधिकरणचे सदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आहे. पालिकेत दर दोन महिन्यांनी वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक होते. साजीद खान पठाण हे या समितीचे अध्यक्ष आहे. या समितीच्या १५ बैठका झाल्या असून, अडचण, त्रास म्हणून आलेल्या अर्जांचा विचार करून ४५० वृक्ष तोडण्यास परवानगी दिली आहे. परंतु एक झाड तोडले तर पाच झाडे जगवावीत, असा नियम आहे. ही बाब लक्षात घेता ज्यांनी वृक्ष तोडले त्यांनी या नियमाचे पालन केले की नाही याची खात्रीच पालिकेमधील संबंधितांनी केलेली नाही. ज्यांनी रितसर परवानगी घेऊन झाडे तोडली त्यांनी मिळून २२५० झाडे आतापर्यंत लावून जगवायला हवी होती, असे नगरसेवक सोनवणे यांनी म्हटले आहे. वृक्ष लागवडीबाबतही नाही तयारीपालिकेने वृक्ष लागवडीबाबत अजूनही तयारी केलेली नाही. जिल्ात अडीच कोटी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन प्रशासनाने केेले आहे. त्यातील अडीच हजार वृक्ष पालिकेस लावायची आहेत. परंतु पावसाळा सुरू झाला तरी अजून खड्डे खोदणे, वृक्ष मागविण्यासंबंधी कार्यवाही करणे याचे नियोजन झालेले नसल्याची माहिती मिळाली.