माहिती मागितली अन् मिळाला मार
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
औरंगाबाद : भूजल सर्वेक्षण कार्यालयात वडिलांच्या निधनानंतर मुलगा व सून दोघेही अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी प्रयत्न करीत आहेत. माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागण्यासाठी गेलेल्या पती, पत्नीलाच अधिकार्यांनी बेदम झोडपून रक्तबंबाळ केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी सदर महिलेने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
औरंगाबाद : भूजल सर्वेक्षण कार्यालयात वडिलांच्या निधनानंतर मुलगा व सून दोघेही अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी प्रयत्न करीत आहेत. माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागण्यासाठी गेलेल्या पती, पत्नीलाच अधिकार्यांनी बेदम झोडपून रक्तबंबाळ केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी सदर महिलेने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विष्णू गवळी हे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयात सुरक्षारक्षक होते. त्यांचे निधन झाल्याने मुलगा कुंदन व सून लक्ष्मी कुंदन गवळी यांनी नोकरीविषयक माहितीच्या अधिकारात ५ जानेवारीला अर्ज दिला होता. माहिती घेण्यासाठी गुरुवारी दोघे गेले असता अधिकारी एस. डी. गडलिंग, अलका तांदळे व सहकार्यांनी कुंदन व लक्ष्मीला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या दाम्पत्याने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेऊन सरळ क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले. अधिक तपास पोहेकॉ पठारे करीत आहेत.