नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी(RSS) संबंधित 'पाञ्चजन्य' या मासिकानं आपल्या नवीन आवृत्तीत देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसवर गंभीर आरोप केले आहेत. 'इन्फोसिस देशविरोधी शक्तींशी संबंधित असून, नक्षलवादी, डावे आणि तुकडे तुकडे गँगला मदत करते', असा आरोप त्या मासिकातून केला आहे.
मोदींविरोधात बातम्या...इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून राष्ट्रविरोधी शक्ती भारताचे आर्थिक हितसंबंध दुखावण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल या मासिकातून केला आहे. तसेच इन्फोसिसवर या मासिकाद्वारे नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, इन्फोसिस नरेंद्र मोदींविरोधात असलेल्या डाव्या आणि इतर अशा कंपन्यांशी दीर्घ काळापासून संबंधित असल्याच्या बातम्या देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
इन्फोसिसच्या कर प्रणालीवर टीकाइन्फोसिसने तयार केलेले नवीन आयकर भरण्याचे पोर्टल 7 जून रोजी ऑनलाइन झाले, परंतु तेव्हापासून करदात्यांना या वेबसाइटवर अडचणी येत आहेत. तसेच, इन्फोसिसने तयार केलेल्या कर भरण्याच्या प्रणालीतील त्रुटींमुळे लोकांचा कर प्रणालीवरील विश्वास कमी होत आहे. अशा वेळी विचार करण्याची गोष्ट आहे की, यामध्ये अँटीनॅशनल शक्तींचे काहीच घेणे-देणे नाही. हे देशाची अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी तर केले जात नाहीये, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.