शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

माहिती अधिकार कायद्याचे म्हाडा अधिकार्‍यांकडून उल्लंघन

By admin | Published: August 17, 2015 10:38 PM

माहिती अधिकार कायद्याचे म्हाडा अधिकार्‍यांकडून उल्लंघन

माहिती अधिकार कायद्याचे म्हाडा अधिकार्‍यांकडून उल्लंघन
अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आयोगाचे आदेश
मुंबई :
म्हाडा कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती देण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांना ही चूक चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. माहिती अधिकार कायद्याचे म्हाडा अधिकार्‍यांनी उल्लंघन केल्याचा ठपका राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी ठेवला आहे. या प्रकरणाची म्हाडा उपाध्यक्षांनी चौकशी करुन संबंधीतांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश माहिती आयुक्तांनी दिले आहेत.
म्हाडा कार्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले ७ मे २0१५ रोजीचे चित्रण आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी म्हाडाकडे मागितले होते. त्यांनी म्हाडाच्या मिळकत व्यवस्थापन विभागाकडे अर्ज करत ही माहिती मागविली होती. परंतू माहिती अधिकार्‍यांनी सीसीटीव्हीची सिडी देण्याबाबत वरिष्ठांच्या अभिप्राय मागविला. त्यामुळे अपिलकर्त्या यांनी प्रथम अपिल केले. त्यानंतर अपिलकर्त्याला माहिती देण्यात आली. परंतू आवश्यक माहिती देण्यासाठी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांनी विधी विभागाचा सल्ला मागितला. त्यामुळे अपिलकर्त्याने मुख्य माहिती आयुक्तांकडे अपिल केले. या अपिलावर झालेल्या सुनावणीत अपिलकत्याने माहिती न मिळल्याबद्दल म्हणणे मांडले.
त्यावर आदेश देताना माहिती आयुक्तांनी म्हाडा अधिकार्‍यांवर ताशेरे ओढले आहेत. माहिती देण्यासाठी विधी विभागाचा अभिप्राय घेणे ही बाब मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांना न शोभणारी असल्याचे, आयुक्तांनी नमूद केले आहे. तसेच या प्रकरणात विधी विभागाचे अभिप्राय घेण्यात आले ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून त्यामुळे आयोगाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याचेही आयोगाने नमूद केले आहे.
अपिलकर्त्यास माहिती देण्यास जनमाहिती अधिकारी यांनी विलंब केला असल्याने म्हाडा उपाध्यक्षांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी केली आहे. तसेच याबाबतचा अनुपालन अहवाल म्हाडा उपाध्यक्षांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत पाठवावा, असेही आदेशात म्हटले आहे.