नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यातील चीनीसैनिकांच्या धोक्याची कहाणी हळू-हळू समोर येऊ लागली आहे. सोमवारी रात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या एका जवानाने, आपल्या वडिलांना त्या रात्रीची थरारक कहाणी सांगितली. या चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले, तर चीनचे 35 सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे.
भारताचे 300 जवान vs चीनचे 2500 जवान -चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग राजस्थानातील अलवर येथे राहतात. सुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला. एका खासगी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जवान सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग यांनी सांगितले, की 'त्या दिवशी मला 11-12 वाजता फोन आला. मी विचारले, कोठे आहे, तर त्याने सांगितले, रुग्णालयात आहे. लेहमधील रुग्णालयात, मी व्यवस्थित आहे.' जवान सुरेंद्र सिंग फोनवर म्हणाले, 'आम्ही 300-400च जवान होतो. चीनी सैनिक अचानक आले. ते 2,000-2,500 होते. त्यांच्याकडे रॉड आणि दंड होते. त्यांनी अचाकच दगड फेक करायला सुरुवात केली. आमच्याकडे शस्त्र नव्हते. माझ्या डोक्याला 10-12 टाके पडले आहेत आणि हाता-पायालाही इजा झाली आहे.'
India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले
जवानाच्या पत्नीने सांगितला, पतीचा पराक्रम -जखमी जवान सुरेंद्र यांची पत्नी गुरप्रीत कौर यांनी आपल्या पतीचा पराक्रम सांगितला. त्या म्हणाल्या, सुरेंद्र यांनी शत्रूच्या दोन-तीन सैनिकांना मारले. यावेळी जवानांकडे शस्त्र नव्हते. चर्चेचे वातवरण होते. चर्चेतून समस्या सोडविण्यावर बोलणे सुरू होते. असे असतानाच चिनी सैनिक शस्त्रांसह आले.
पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'
तणाव कायम -गेल्या 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. गेल्या महिनाभरापासून लडाखच्या अनेक भागांत चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर आहे. चर्चेनंतरही चीन दिलेला शब्द पाळायला तयार नाही. त्यांनी भारतीय सैनिकांनाही धोका दिला आहे. चर्चा सुरू असतानाही चीन सीमेवर सैनिक आणि शस्त्रांचा साठा वाढवतच होता.
गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO