शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

निर्दोष

By admin | Published: December 11, 2015 2:40 AM

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून, रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीब मजुरांना चिरडल्याबद्दल दाखल झालेल्या सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खान १३ वर्षांनी सुटला.

मुंबई : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून, रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीब मजुरांना चिरडल्याबद्दल दाखल झालेल्या सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खान १३ वर्षांनी सुटला. ज्याआधारे आरोपीला दोषी ठरवावे असे नि:संशय पुरावे सादर करण्यात अभियोग पक्ष सपशेल अपयशी ठरला, असा निष्कर्ष नोंदवत उच्च न्यायालयाने सलमानला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. न्या. ए.आर. जोशी यांनी गेले चार दिवस सुरू असलेले निकालपत्राचे वाचन संपवून हा निर्णय जाहीर केला तेव्हा न्यायालयात हजर असलेला सलमान अत्यंत भावुक झाला व त्याला आनंदाश्रू आवरणे कठीण गेले.सत्र न्यायालयाने गेल्या ६ मे रोजी सलमानला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध सलमानने केलेले अपील मंजूर करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, घटनेच्या वेळी सलमान खानने मद्यप्राशन केलेले होते, तशा अवस्थेत तो स्वत: मोटार चालवीत होता आणि या घटनेत मरण पावलेल्या नुरुल्ला या मजुराचा मृत्यू भरधाव मोटारीखाली चिरडून झाला यापैकी कोणतीही बाब अभियोग पक्ष नि:संशयपणे सिद्ध करू शकलेला नाही. साक्षी-पुराव्यांमध्ये अनेक त्रुटी व विसंगती आहेत ज्याने या प्रत्येक बाबतीत संशयाला जागा आहे. त्यामुळे फौजदारी न्यायप्रक्रियेनुसार या संशयाचा फायदा देऊन सलमान खानला निर्दोष ठरविले जात आहे.न्या. जोशी यांनी सोमवारपासून निकालपत्र सांगण्यास सुरुवात केली आणि सादर झालेले साक्षी-पुरावे, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व कायद्याचे निकष यांचे विवेचन करीत खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा ठरविला. (प्रतिनिधी)न्यायालयाचे काही निष्कर्षअभियोग पक्ष ही केस नि:संशयपणे सिद्ध करण्यास अपयशी ठरला आहे. घटनेच्या वेळी अर्जदार आरोपी (सलमान) मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता आणि अपघात होण्यापूर्वी टायर फुटला की अपघानंतर टायर फुटला, हेही सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत.या केसमधील अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार कमाल खान २००७ पर्यंत भारतात असतानाही त्याची साक्ष नोंदवण्यात आली नाही आणि सरकारी वकिलांनीही त्याला सत्र न्यायालयात सरकारी वकिलांचा साक्षीदार म्हणून हजर केले नाही.पोलिसांनी रक्ताचे नमुने चाचणीसाठी नेताना अक्षम्य चुका केल्या.तपास यंत्रणेने अत्यंत ढिसाळपणे तपास केला.सत्र न्यायालयानेही साक्षी-पुराव्यांचे मूल्यमापन कायदेशीर निकषांवर योग्यपणे केले नाही.>> साक्षीत तफावतत्या अपघातात जखमी झालेल्याने १२ वर्षांनंतर सांगितले, सलमान गाडीतून उतरण्यापूर्वी दोनदा पडला. मात्र, यातही अनेक पळवाटा आहेत. पाटील यांची साक्ष आणि एफआयआर यामध्ये सलमानने मद्यपान केल्याचे कुठेही नमूद केलेले नाही. पाटील याने एफआयआरमध्ये सलमानने वेगाने गाडी चालवली आणि आपण दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे, असे न्या. जोशी यांनी निकालात म्हटले.साक्ष अविश्वसनीयसलमानचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील याने घटना घडल्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. घटनेच्या वेळी तो गाडीत होता आणि त्याची साक्ष अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, ही साक्षही नंतर बदलण्यात आली. रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर, त्याने सलमानने गाडी चालवताना मद्यपान केल्याचे दंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे पाटील याची साक्ष विश्वसनीय नाही. >>सलमान गाडी चालवत नव्हताअपघात झालेली गाडी सलमान चालवत होता, हे कुठेही सिद्ध झाले नाही. एकट्या पाटीलने सलमान गाडी चालवत असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याच्या म्हणण्याला दुजोरा देणारा एकही पुरावा किंवा साक्षीदार हजर करण्यात आला नाही. त्यामुळे ‘त्या’ रात्री सलमान गाडी चालवत असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही, असेही न्या. जोशी यांनी म्हटले.>> ‘हिट अ‍ॅण्ड रन’ नाहीसलमान गाडी चालवत नसला, तरी गाडी त्याची असल्याने अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करणे, हे त्याचे कर्तव्य होते. मात्र, अपघात झाल्यानंतर एवढी गर्दी झाली की, त्याच्यावर नियंत्रण मिळवणे त्याला कठीण झाले, तसेच लोकांच्या हातात रॉड आणि दगड असल्याने, त्याने तेथून पळ काढल्याचे म्हणत, न्या. जोशी यांनी सलमानला ‘हिट अँड रन’च्या आरोपातून मुक्त केले. >> क्रेनमधून गाडी पडली... न्या. जोशी म्हणाले की, सलमानच्या गाडीने नुरुल्ला याचा मृत्यू झालाच नाही. त्याच्या गाडीच्या अपघातानंतर, ती हटवण्यास क्रेनचा वापर करण्यात आला. ही गाडी जड असल्याने क्रेनच्या पकडीतून ती सुटली आणि ही गाडी नुरुल्ला याच्या अंगावर पडली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा युक्तिवाद सलमानच्या वकिलांनी केला होता. न्या. जोशी यांनी तो मान्य केला.>>हायकोर्टाने खोडले सारेच मुद्देसत्र न्यायालयाने निकालात मांडलेले सर्व मुद्दे उच्च न्यायालयाने सपेशल खोडून काढले. शिवाय सत्र न्यायालयाने दोषी ठरविलेल्या सर्व आरोपांतून सबळ पुराव्यांअभावी हायकोर्टाने मुक्तता केली.>> काय म्हणाले सत्र न्यायालय?१. कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलची साक्ष ग्राह्य२. अशोक सिंह गाडी चालवत नव्हता३. अपघातानंतरच गाडीचा टायर फुटला४. सलमान ‘त्या’ रात्री दारू प्यायला होता५. सलमानच गाडी चालवत होता६. गाडीमध्ये फक्त तिघेच होते७. सलमानच्या रक्तामध्ये अल्कोहोल आढळले८. सलमानला ५ वर्षे शिक्षा, २५ हजारांचा दंड>>> ...त्यावर उच्च न्यायालयाचा निकाल१. कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलची साक्ष विश्वासार्ह नाही२. अशोक सिंहची साक्ष ग्राह्य धरली जावी३. टायर कधी फुटला हे सिद्ध होत नाही४. सलमान दारू प्यायल्याचे सिद्ध होत नाही५. सलमानच गाडी चालवत असल्याचे सिद्ध होत नाही६. गाडीत असलेल्या कमाल खानची साक्ष का घेतली नाही?७. रक्ताची तपासणी करताना अक्षम्य चुका८. सलमानची निर्दोष मुक्तता___________________कोर्टाचा निकाल विनम्रतेने स्वीकारतोमी न्यायालयाचा निकाल विनम्रतेने स्वीकारतो. कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी आभार मानतो- सलमान खान, अभिनेताअभ्यासानंतर पुढील निर्णयनिकालाचा अभ्यास केल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयात जाण्याविषयीचा निर्णय घेतला जाईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीगरिबांना कोणी विचारत नाहीआमच्यावर अन्याय होतो आहे. गरिबाचा कोणी विचारत करत नाही. सलमानने पैशांमुळे हा खटला जिंकला. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.- मृत नुरुल्ला मेहबूब शरीफची पत्नी