चेन्नई : आंध्र प्रदेश पोलिसांची कथितरीत्या रक्तचंदन तस्करांविरुद्धची मोहीम चांगलीच वादात सापडली आहे. या मोहिमेत ठार झालेल्या २० जणांपैकी दोन मृतांच्या कुटुंबियांनी गुरुवारी तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यात निदर्शने करीत, या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेत २० जण ठार झाले होते. हे सगळे चंदन तस्कर असल्याचा आंध्र पोलिसांचा दावा आहे. याउलट यापैकी अनेकजण आमच्या राज्यातील निष्पाप लाकूडतोडे मजूर असल्याचा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. दरम्यान सदर मोहिमेत ठार झालेले शशीकुमार व मुरुगन यांच्या कुटुंबियांनी शेकडो स्थानिकांसह तिरुवन्नामलाई जिल्ह्याच्या पडवेडू येथे मुख्य रस्त्यावर झोपून या घटनेचा निषेध नोंदवला. या घटनेच्या चौकशीची मागणी त्यांनी लावून धरली. अराकोणम, होसूर व चेन्नई अशा अनेक ठिकाणी निदर्शने झाली.पीएमकेकडून निंदारक्तचंदन तस्करांविरुद्धच्या पोलीस मोहिमेविरुद्ध मोदी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या पीएमकेनेही मोर्चा उघडला आहे. या घटनेवर पंतप्रधानांचे मौन निषेधार्ह असल्याचे पीएमकेचे संस्थापक एस. रामदास यांनी म्हटले आहे. या घटनेची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वा सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.ओडिशात सापडले रक्तचंदनब्रह्मापूर : ओडिशाच्या गजपती जिल्ह्यालगतच्या महेंद्रा जंगलात गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात सुमारे १२ चंदन तस्करांना गुरुवारी अटक करण्यात आली. (वृत्तसंस्था)