ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 06 - कोट्यावधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारती यांना आयकर विभागाने चौकशीसाठी 12 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे.
दिल्लीतील बिजवासन येथील बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मिसा भारती यांना आयकर विभागाने चौकशीसाठी आज (दि.06) हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, मिसा भारती आयकर ऑफिसमध्ये हजर झाल्या नसून त्यांच्या जागी त्यांचे वकील हजर राहिले. वकिलांनी मिसा भारती यांना हजर होण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली. त्यावर आयकर विभागाने मिसा भारती यांना गैरहजर राहिल्याप्रकरणी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि 12 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. याचबरोबर, मिसा भारतीचे पति शैलेश यांची आयकर विभागाचे अधिकारी बुधवारी चौकशी करण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने शैलेश आणि मीसा भारती यांना 16 मे रोजी समन्स पाठवले होते.
दरम्यान, आठ हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भारती यांचे सीए राजेश अग्रवाल याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेड्या ठोकल्या होत्या. शिवाय आयकर विभागाने दिल्ली आणि गुरुग्राम येथील लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे छापे 1 हजार कोटींच्या अघोषित मालमत्तेच्या व्यवहाराच्या आरोपावरून मारण्यात आले होते.
Misa Bharti fined Rs.10,000 for not appearing today;Fresh summon issued for her to appear on 12 June;her husband Shailesh to appear tomorrow— ANI (@ANI_news) June 6, 2017
Income Tax Dept issues show cause notice for penalty to Misa Bharti for not appearing for questioning in money laundering case against her pic.twitter.com/osMwVMTuc3— ANI (@ANI_news) June 6, 2017