आयएनएसने केला केरळ सरकारचा तीव्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 03:59 AM2017-11-24T03:59:42+5:302017-11-24T03:59:55+5:30
नवी दिल्ली : तिरुअनंतपूरम येथील सचिवालयात माध्यमांवर ठेवल्या जाणाºया अंकुशाबद्दल इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या वतीने अध्यक्ष अकिला उरणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नवी दिल्ली : तिरुअनंतपूरम येथील सचिवालयात माध्यमांवर ठेवल्या जाणा-या अंकुशाबद्दल इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या वतीने अध्यक्ष अकिला उरणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माजी मंत्री ए.के. शशिंद्रन यांच्यावरील आरोपांबाबत पी. एस. अँटोनी समिती मुख्यमंत्र्याकडे आपला अहवाल सोपवण्यासाठी मंगळवारी आली होती. या बातमीसाठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी सचिवालयात जात होते. त्याचवेळी तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाण्यास मज्जाव केला.
माध्यम प्रतिनिधींना बातमी मिळवण्यापासून थांबवण्याचा हा केरळ सरकारचा प्रयत्न निंदनीय असून, माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे आयएनएसचे मत आहे. आयएनएसच्या प्रांतिय समितीचे अध्यक्ष एम. व्ही. श्रेयम कुमार यांनीही सरकारच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली.