शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
3
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
4
आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ
5
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
6
तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही
7
"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट
8
Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका
9
महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?
10
ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त
11
AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला
12
नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
13
"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका
14
हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात
15
काँग्रेसने तिकीट दिलं, पण एबी फॉर्मच दिला नाही; दिलीप मानेंनी अपक्ष भरला अर्ज
16
IND vs NZ : भारताला भारतात पराभूत करणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं - टीम साऊदी
17
हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर
18
अचानक Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
19
महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
20
'दाऊदचा साथीदार फडणवीसांच्या जवळ..', मलिकांच्या उमेदवारीवरुन चतुर्वेदींची बोचरी टीका

समुद्राचा राजा; अणुयुद्धातही लढण्याची ताकद, स्वदेशी बनावटीची 'INS इंफाळ' नौदलात सामील ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 3:06 PM

INS Imphal : ही मेड इन इंडिया युद्धनौका विविध आधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.

Indian NAVY : भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. स्वदेशी बनावटीचे स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र नाशक 'INS इंफाळ' मंगळवारी भारतीय नौदलात दाखल झाले. आयएनएस इंफाळचे नौदलात कमिशनिंग मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झाले. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. 

ही मेड इन इंडिया युद्धनौका विविध आधुनिक क्षेपणास्त्रे आणि तंत्रज्ञांनाने सुसज्ज आहे. यावरील ब्रह्मोस क्षेपणास्त्र 90 अंशात फिरुन शत्रूंवर हल्ला करू शकते. हिंद महासागरात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत, अशा परिस्थितीत आयएनएस इंफाळ भारताची सागरी क्षमता मजबूत करेल, असा विश्वास संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आयएनएस इंफाळ ही पहिली युद्धनौका आहे, ज्याला ईशान्येतील एका शहराचे नाव(इंफाळ) देण्यात आले आहे. 

अशी आहे INS इंफाळ163 मीटर लांब, 7,400 टन वजनी आणि 75 टक्के स्वदेशी वस्तुंद्वारे तयार केलेली आयएनएस इंफाळ भारतातील सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक आहे. ही समुद्रात 30 नॉट्सपेक्षा जास्त वेग गाठण्यास सक्षम आहे. याशिवाय, ही जमिनीवरुन जमिनीवर आणि जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रे आणि सेन्सर्सनी सुसज्ज आहे.

अणुयुद्धाच्या परिस्थिती आघाडीवर असेलया युद्धनौकेला आधुनिक मॉनिटरींग रडार बसवण्यात आले आहे, ज्यामुळे तिचे लक्ष्य सहजपणे शोधण्यात मदत होते. याची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता, स्वदेशी विकसित रॉकेट लाँचर्स, टॉर्पेडो लाँचर्स आणि ASW हेलिकॉप्टरमधून येते. ही युद्धनौका आण्विक, जैविक आणि रासायनिक (NBC) हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम आहे. या युद्धनौकेवर असलेल्या काही प्रमुख स्वदेशी शस्त्रांमध्ये टॉर्पेडो ट्यूब, अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्स, सुपर रॅपिड गन माऊंट, प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक पॉवर मॅनेजमेंट सिस्टमसारखे अनेक फीचर्स आहेत. 

या कंपन्या मिळून तयार केलेसंरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, BEL, L&T, गोदरेज, मरीन इलेक्ट्रिकल, BrahMos, Technico, Kineco, Jeet & Jeet, Sushma Marine, Techno Process सारख्या MSME ने मिळून ही शक्तिशाली युद्धनौका तयार केली आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलRajnath Singhराजनाथ सिंहEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई