Politics over INS Vikrant: कोचीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'INS विक्रांत' नौदलाला समर्पित केली. पंतप्रधान मोदींनी यावेळी नौदलाचा नवीन लोगोही लॉन्च केला. INS विक्रांतमुळे नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे. पण, आता यावरुन राजकारण सुरू झाले आहे. भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे जहाज राष्ट्राला समर्पित करण्याचे श्रेय घेतल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि आधीच्या सरकारांच्या योगदानाला योग्य स्थान न दिल्याचा आरोपदेखील केला.
काँग्रेसने शेअर केला जुना व्हिडिओकाँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांनी ऑगस्ट 2013 मध्ये INS विक्रांतचे उद्घाटन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जयराम रमेश म्हणाले की, 'नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत, म्हणूनच ही विमानवाहू युद्धनौका देशाला समर्पित करत आहेत. मोदी सरकारचा याच्याशी काही संबंध नाही. मोदी सरकार सत्तेवर असताना याचा नौदलात समावेश केला जातोय. पण, 12.8.2013 रोजी तत्कालिन संरक्षणमंत्री एके अँटनी यांनी INS विक्रांत लाँच केली होती. डिझाईनपासून निर्मिती आणि लॉन्च होण्यापर्यंत 22 वर्षे लागली आहेत. मोदी सरकारने आता त्याचा नौदलात समावेश केला आणि त्याचे श्रेय घेत आहे,' असा आरोप त्यांनी केला.
भारताचे मोठे यश...आज पंतप्रधानांच्या हस्ते कोचीमध्ये 'INS विक्रांत' नौदलाच्या स्वाधिन करण्यात आली. यामुळे आता भारत अशा निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांच्याकडे स्वतःची एवढी मोठी युद्धनौका तयार क्षमता आहे. एकूण 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद हे जहाज 28 नॉटिकल मैल ते 7500 नॉटिकल मैल अंतर पार करू शकते. 20,000 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही विमानवाहू युद्धनौका अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. स्वदेशी बनावटीच्या 'अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर' (ALH) व्यतिरिक्त मिग-29K फायटरसह 30 विमाने चालवण्याची क्षमता यात आहे.